Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Firing News: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जुन्या वादातून तीन राऊंड फायर; चारचाकीतून आले अन्…

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर दोन तरुणांना लक्ष्य करत भरदिवसा तीन राऊंड फायर करण्यात आले. गोळ्या भरकटल्याने दोघेही थोडक्यात बचावले; गोळीबारानंतर हल्लेखोर चारचाकीतून पसार झाले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 14, 2026 | 03:28 PM
Firing News: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जुन्या वादातून तीन राऊंड फायर; चारचाकीतून आले अन्...

Firing News: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जुन्या वादातून तीन राऊंड फायर; चारचाकीतून आले अन्...

Follow Us
Follow Us:
  • गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर तीन राऊंड गोळीबार
  • चारचाकीतून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून वाहनातून पळ
  • जुन्या वादातून बेलवंडी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
अहिल्यानगर: अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील गव्हाणेवाडी परिसरात जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी दोन तरुणांना लक्ष्य करत तीन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, गोळ्या मिसफायर झाल्याने सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर चारचाकीतून पसार झाले.

चारचाकीतून आले हल्लेखोर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बाराच्या सुमारास गव्हाणेवाडी हद्दीत दोन तरुण रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून काही जण तेथे आले. वाहनातून उतरल्यानंतर किंवा वाहनातूनच या तरुणांना लक्ष्य करत गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य 

तीन राऊंड फायर

हल्लेखोरांनी तीन वेळा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, गोळ्या भरकटल्याने दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. हल्लेखोरांनी कोणताही वेळ न दवडता चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पळ काढला.

दोन्ही गट पारनेरचे?

दरम्यान, ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ज्यांनी गोळीबार केला, त्या दोन्ही गटांतील तरुण पारनेर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, नेमका वाद कशावरून होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा:Sangali Crime: विमा-सेसपोटी ५२.४८ लाख रुपये वसूलपात्र; ७९.५० कोटींच्या कचरा प्रकल्पाच्या निविदेवर लेखापरीक्षणाचे गंभीर आक्षेप

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

गोळीबारानंतर आरडाओरड झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाहणी केली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या महामार्गालगत दोन तरुणांवर गोळीबार झाल्याने गव्हाणेवाडी परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Web Title: Firing on the ahilyanagar pune highway atmosphere of fear in the gavhanewadi area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.