
17 तारखेला रात्री 11.00 वाजता अलिबाग समोरील समुद्रात मासेमारी करीत असताना यशवंत गणपत नाखवा रा.साखरकोळीवाडा पो.आक्षी ता.अलिबाग जि.रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा IND-MH-3-MM-4194 ही नौका अनिधकृत एलएईडी पध्दतीने मासेमारी करीत असताना आढळली.ही नौका देखील मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली.
तसंच18 तारखेला सकाळी 6 वाजता श्री.प्रकाश तुकाराम पाटील रा.करंजा ता.उरण जि.रायगड यांची मासेमारीनौका श्रीसमर्थ कृपा क्रं.IND-MH-7-MM-3627 या नौकेची विभागाच्या गस्तीनौकेवरून तपासणी केली असता सदर नौकेत 1) 4000 वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे चार नग २) 3000 वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे तीन नग 3) 2500 वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे एक नग 4) सीया लाईट 1000 वॅटचे 16 नग ५) चारशे वॅटचे 2 नग हॅलोजन बल्ब ६) एक जनरेटर असे अनिधकृत एलएईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले आहे.उपरोक्त प्रमाणे तीनही अनधिकृतपणे एलएईडी मासेमारीनौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दहाड सत्रात पकडण्यात आल्या असून सदरच्या मासेमारी नौका व त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सागरी सुरक्षा विभाग सतर्कपणे याबाबत कारवाई करत असून अनधिकृत मासेमारी करण्यांवर निर्बंध घातले जात आहे. यामुळे अनधिकृत मासेमारीला आळा तर बसेलच पण सागरी सुरक्षा देखील वाढण्यात येण्याची शक्यता आहे.
Ans: सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून, विशेषतः LED / अंडर वॉटर लाईटचा वापर करून केली जाणारी मासेमारी म्हणजे अनधिकृत मासेमारी होय.
Ans: 4000 वॅट, 3000 वॅट, 2500 वॅटचे अंडर वॉटर LED लाईट 1000 वॅटचे सीया लाईट 400 वॅटचे हॅलोजन बल्ब जनरेटर असे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मासेमारी साहित्य जप्त करण्यात आले.
Ans: अनधिकृत हालचालींवर नियंत्रण आल्याने सागरी सुरक्षा वाढेल बेकायदेशीर नौकांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल