Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 11, 2026 | 04:11 PM
Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘रामलक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘रामलक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Follow Us
Follow Us:
  • खालापुरात थोरवेंची प्रतिष्ठा धुळीला
  • नरेश पाटील आणि भाई शिंदेंच्या करिष्म्याने भगवा वाचला
  • कर्जत-खालापूरमध्ये महायुतीला धक्का
 

Raigad Zilla Parishad: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदार संघात पानिपत झालेले पहावयास मिळाले, कर्जतमध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.

कर्जत खालापूर मतदार संघात कर्जत तालुक्यात सहा व खालापुरात चार जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कर्जत तालुक्यात बारा व खालापुरात आठ जागासाठी मतदान झाले. शिवसेना भाजप आरपीआय अश्या महायुतीत लढणाऱ्या शिवसेना पक्षाला या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा पक्षाच्या परिवर्तन विकास आघाडीने अक्षरशः धूळ चारली.

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी

कर्जतच्या सहाच्या सहा जागा परिवर्तन विकास आघाडीने जिंकत व पंचायत समितीच्या बारा पैकी दहा जागा जिंकत शिवसेना महायुतीचे अक्षरशः पानिपत केले. कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेना महायुतीचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. खालापूरमध्ये आत्करगाव जिल्हापरिषद ही जागा व खानाव ही पंचायत समितीची जागा शिवसेनेने जिंकल्यामुळे खालापुरात शिवसेना पानिपत होण्यापासुन तरली आहे.

आल्करगाव जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे या रामलक्ष्मणाच्या जोडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची एक जागा जिंकत शिवसेनेला तारले आहे, नरेश पाटील यांची सून रेश्मा पाटील व खानाव पंचायत समितीमध्ये स्वतः भाई शिंदे हे निवडणूक लढवत होते. ही राम लक्ष्मणची जोडी एकत्र आहे व भगवा फडकावणारच अशी भीमगर्जना भाई शिंदे आणि नरेश पाटील यांनी प्रचार दरम्यान केली होती.

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु

भाई शिंदे आणि नरेश पाटील फार जुने शिवसैनिक व एकदा एकमेकांसमोर जिल्हा परिषदची जागा लढले होते, त्यामुळे आत्करगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकूण एक मतदारांची त्यांना ओळख होती. दोघांच्या दौन ताकदी एकत्र आल्याने हा विजय त्यांना सोपा झाल्याचे बोलले जात आहे. खालापुरात चार जिल्हापरिषदच्या जागा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व शिवसेना उबाटाला मिळाली. त्यामुळे खालापुरात या चारही पक्षाना समसमान यश मिळाले व एक प्रकारे शिवसेना तरली व नाक वाचले.

आमदार शिवसेनेचा असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांनी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी काढत मोठे आव्हान उभे केले व संपूर्ण कर्जत खालापूर मतदार संघाचा विचार केला तर परिवर्तन विकास आघाडीने आमदार महेंद थोरवे यांना जोरदार धक्का दिला, पण खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी विजय खेचून आणित शिवसेनेला तारले असल्याने भाई शिंदे व नरेश पाटील यांच्या रामलक्ष्मणच्या जोडीमुळे शिवसेना तरली असे बोलले जात आहे.

Web Title: Mahayuti lost in karjat naresh patil and bhai shinde won

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Mahendra Thorve
  • raigad
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
1

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात
2

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
3

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड
4

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.