Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी ते चौरंगी लढती झाल्या असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 08, 2026 | 11:20 AM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Follow Us
Close
Follow Us:
  • पनवेलच्या गट- गणांसाठी ७५ % मतदान
  • तिरंगी लढतींनी पनवेलचे राजकारण तापले
  • ९ तारखेच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा 
Raigad Zilla  Parishad: पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी ते चौरंगी लढती झाल्या असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. भाजपाचे कमळ विरुद्ध शेकापचा खटारा अशी थेट टक्कर बहुसंख्य ठिकाणी झाली आहे. मतदान संपल्याच्या वेळेला अंदाजे ७५% च्या आसपास मतदान झाले असून निवडणुकीला उभ्या असलेल्या ६४ उमेदवरांची धाकधूक वाढली आहे. मतदारांचा कौल या निवडणुकीत कोणाला निर्णायक ठरणार आहे? हे ९ तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Kokan ZP Election: चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे खोळंबा; खेर्डीत मतदारांचा संताप, कोकणात काय आहे मतदानाची स्थिती?

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांचे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर झालेल्या माघारीनंतर प्रत्यक्ष लढतीसाठी ६४ उमेदवार मैदानात उतरले आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण ११९ अर्ज वैध ठरले होते. यामध्ये
जिल्हापरिषद गटासाठी ३८ तर पंचायत समिती गणांसाठी ८१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. मंगळवार हा अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. या अखेरच्या दिवशी तब्बल ५५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र बदलले आहे.

पनवेल तालुक्यातील ३४६ मतदान केंद्रावर ८ गट व १६ गणासाठी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी एकुण ३४६ पथके तयार करण्यात आली होती. ही पथके के. ई. एस. इंदुबाई ए. वाजेकर, इंग्लिश मेडीयम शाळा पनवेल येथुन मतदान यंत्रासह आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्तासह तैनात होते. या निवडणूकीकरीता पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद रायगड गटासाठी एकुण १८ उमेदवार व पंचायत समिती पनवेल गणासाठी एकुण ४६ उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्यासाठी पनवेल तालुक्यातील १८०० कर्मचारी मतदान केंद्रावर कर्मचारी व मतदान यंत्रे सुरक्षित पोहोच करण्यासाठी मतदान प्रक्रियेसाठी कार्यान्वित होते. त्यासाठी जवळपास ४० एस.टी. बसेस, ३० मिनी बसेस व २१ इको वाहन व क्षेत्रीय अधिकारी यांना ४४ चारचाकी वाहने पुरविण्यात आली होती. आता ९ तारखेला लागणाऱ्या निकालाची प्रतिक्षा आहे.

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

या निवडणूकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मिनल भामरे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळ पथक, वाहन पथक, आचारसंहिता पथक, संगणकीय कामकाज पथक अशा विविध पथकाने जवळपास एक महिन्यापासुन पुर्वतयारी केली होती.
या निवडणुकीत बहुतेक जिल्हा परिषद गटांमध्ये शेकापचे ‘खटारा’ आणि भाजपचे ‘कमळ’ यांच्यात दुरंगी लढत झाली आहे. केवळ दोन गट वगळता उर्वरित सर्व ठिकाणी थेट सामना रंगला असल्याने राजकीय चुरस वाढली आहे. पंचायत समितीच्या अनेक गणामध्ये मात्र तिरंगी लढत पार पडल्याने मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Zilla parishad elections in panvel taluka received an enthusiastic response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • panvel
  • raigad
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Panvel : अतिक्रमणावर प्रशासनाची मोठी कारवाई; अनधिकृत बांधकामावर फिरवला बुलडोझर
1

Panvel : अतिक्रमणावर प्रशासनाची मोठी कारवाई; अनधिकृत बांधकामावर फिरवला बुलडोझर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.