Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded: नांदेडमध्ये राजकीय खळबळ! माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांचे अपहरण, जीवघेणी मारहाण; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप

नांदेडमध्ये माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर घोगरेंनी गंभीर आरोप केले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 23, 2025 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जीवन घोगरे यांचे अपहरण; अज्ञात स्थळी नेऊन मारहाण, गंभीर दुखापत
  • आमदार प्रताप पाटील चिखलीकर व सहकाऱ्यांवर घोगरेंचे आरोप
  • सात आरोपी अटकेत; नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापले
नांदेड: नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्यावर अपहरण करून जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अपहरण होतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहेत. अपहरणकर्त्यांनी आपला संतोष देशमुख करू अशी धमकीही दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. त्यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीमागे अजितदादांच्या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला आहे. या अपहरण आणि मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहे. अपहरण होतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे.

Year Ender 2025 : वर्षभरात अंगावर काटा आणणऱ्या घटना…! कोलकाता सामूहिक बलात्कार, निळा ड्रम हत्याकांडपासून ते सोनम रघुवंशी प्रकरण

काय घडलं नेमकं?

ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. जीवन घोगरे हे आपल्या घरातून कामानिमित्त बाहेर निघाले होते. हडको येथील पाण्याच्या टाकी जवळ त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यांना दुसर्या गाडीत जबरदस्तीने बसवण्यात आले. नंतर त्यांना अज्ञात स्थळी नेऊन जबर मारहाण केली.नंतर मुसलमानवडी जवळ जीवन घोगरे यांना सोडून देण्यात आले. सात जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला. या मारहाणीमध्ये घोगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

सात आरोपींना अटक

पोलिसांना या घटनेची माहितीमिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जीवन घोगरे यांच्या फिर्यादिनुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपले तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. जीवन घोगरे यांना मारहाण करणाऱ्या सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर ( चालक ), देवानंद भोळे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

नांदेडमधील सिडको भाग बंद

जीवन घोगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मंगळवारी नांदेडमधील सिडको भाग पूर्ण बंद पाळणार आहे. आपल्यावर झालेल्या हल्लयाचे मुख्य सूत्रधार हे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रताप पाटील चिखलीकर हे आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना केला सवाल

‘चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस’ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी आपल्याला दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर आरोप करताना जीवन घोगरे म्हणाले की, “माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. असल्या गुंडाला तुम्ही मंत्री करणार का? माझा संतोष देशमुख करून टाकतो अशी सुद्धा धमकी त्यांनी दिली. जमिनी लुटायचे, कब्जे करायचे हे यांचे धंदे आहेत.” अशा गुंडांना मोठं करू नका, नांदेडमधील गुंडाराज बंद करा असं आवाहन जीवन घोगरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

क्रिप्टोच्या नावाखाली देशाला गंडा! ED चे महाराष्ट्र, कर्नाटकसह २१ ठिकाणी एकाच वेळी छापे; मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना नेमकी कशी घडली?

    Ans: घरातून निघाल्यानंतर घोगरे यांना जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत बसवून मारहाण करण्यात आली.

  • Que: या प्रकरणात कोणावर आरोप आहेत?

    Ans: आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यावर आरोप आहेत.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: सात आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Former leader of the opposition jeevan ghogre was kidnapped and brutally assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • crime
  • Nanded

संबंधित बातम्या

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
1

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.