Crime News In Marathi : 2025 हे वर्ष संपण्यासाठी अवघे दिवस शिल्लक राहीले आहेत. हे वर्ष शेकडो नागरिकांसाठी दु:ख, शाप आणि धक्कादायक घटनांनी भरलेले,असं म्हणायला वावग ठरणार नाही.
२०२५ या वर्षांला निरोप देताना आपण २०२६ च जल्लोषात स्वागत करणार आहोत. मात्र इतिहास आपल्या मनावर घर करून जातो. अगदी तसच काहीस २०२५ या वर्षात घडलं. त्याच करण ही तसंच आहे, अश्या अनेक घटना या वर्षात घडल्या की ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. २०२५ मधली सगळ्यात मोठी घटना होती, ती म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ला… ज्याने जगाला हादरवून सोडलं. या घटनेनंतर भारताला पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं. मात्र अशा अनेक इतर ही घटना आहेत ज्याने माणूस म्हणून आपल्याला विचार करायला भाग पाडलं.
जसे की पत्नीने प्रियकरासाठी आपल्या पतीची हत्या केली. अल्पवयीन मुलींवर आणि मुलांवर लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, मित्रांनीच पैश्यांसाठी मित्राची हत्या केली. रक्षक बनला भक्षक, दहशतवादी हल्ला अश्या अनेक गुन्हेगारी घटना यावर्षी घडल्या. या वर्षभरात नक्की काय घडलं? याचा आपणं मागोवा घेवूयात.
पहलगाम दहशतवादी हल्ला
या वर्षातील ही सगळ्यात मोठी घटना होती. ज्या घटनेने देश हादरून गेला होता. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात पहलगाममध्ये पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी २५ जणांना गोळ्या घातल्या आणि त्या नंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला. या नंतर पुन्हा देशावर दहशतवादी हल्ला होवू नये यासाठी आपल्या सगळ्या यंत्रणा सतर्क आहेत.
कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण
कोलकात्यामध्ये घडलेल्या या घटनेने अक्षरशः माणुसकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोलकात्याच्या सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचारकरून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले होते. ९ ऑगस्ट २०२४ रोजी आरजी कार रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमधून पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत होता. त्याचे हेडफोनही घटनास्थळी सापडले. याप्रकरणाची सुनावणी नोव्हेंबर २०२४ रोजी सुरु झाली आणि २० जानेवारी 2025 आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अखेर पीडित मुलीला न्याय मिळाला. या घटनेनंतर मुली किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतोच.
मेरठ निळा ड्रम हत्याकांड
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पत्नीने प्रियकरासाठी पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एकंदरित काय तर पती आणि पत्नी या नात्यामध्येही अविश्वास पाहायला मिळाला. प्रियकराच्या मदतीने खून करून ती पळून जाण्याच्या तयारीत होती. पतीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरून ठेवण्यात आले. म्हणून या हत्या कांडाला निळा ड्रम म्हणून ओळखलं जात. मुस्कान रस्तोगी हिने आपल्या पतीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले होते. या घटनेने नवरा बायकोच्या नात्यातील धक्कादायक वास्तव समोर आल होत. या प्रकरणात आता चार्जशीट दाखल करण्यात आला आहे. मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर आरोपी या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण
सोनम रघुवंशी हिने केलेल्या हत्या कांडची संपूर्ण देशात चर्चा होती. राजा रघुवंशी हा सोनम रघुवंशीचा पती, हे दोघे ही लग्नानंतर हनीमूनसाठी निघतात, पण हनीमूनवरून येताना मात्र सोनम एकटीच निघून आलेली असते. कारण हनीमूनच्या रात्री सोनमने राजा रघुवंशीला मारण्याचा कट रचला होता. त्यानुसार पती राजा रघुवंशीची हत्या करते. मिळालेल्या माहितीनुसार तिला तिच्या प्रियकरासोबत पळून जायच होत. त्यासाठी तिने आपल्या नवऱ्याचा काटा काढला. मेघालयतून पळून जाऊन ती उत्तर प्रदेशात सापडली होती. या प्रकरणात पोलिसांनी ७०० पानांच आरोप पत्र दाखल केल आहे. सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर या प्रकरणात अटक करण्यात आली.
२०२५ वर्षाचा निष्कर्ष
2025 हे वर्ष केवळ दिवस, तारीखा आणि घटना नव्हती, तर शेकडो कुटुंबांच्या आयुष्यावर खोल परिणाम करणाऱ्या घटनांचे वर्ष होते. देशातील सुरक्षा, प्रशासन आणि नागरिकांच्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष धक्कादायक, शिकवणारे आणि सावधान करणारे ठरले. यंदा घडलेल्या प्रत्येक घटनेने आपल्याला दाखवले की, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी, जर नियम आणि सुरक्षा पद्धतींचे पालन केले नाही तर परिणाम किती गंभीर ठरू शकतात.
Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…
Ans: पहलगाम दहशतवादी हल्ला, ज्यात 25 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
Ans: महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आणि व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या.
Ans: सुरक्षा, कायदा व सामाजिक जबाबदारी याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम अत्यंत गंभीर होतात.






