Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर…, 72 जणांकडून 10 वर्ष पत्नीनेवर करायला लावले आळीपाळीने लैंगिक अत्याचार

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अंमली पदार्थ देऊन आपल्या पत्नीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणे, तसंच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी अनेक व्यक्तींना बोलावणे या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 06, 2024 | 01:38 PM
72 जणांकडून 10 वर्ष पत्नीनेवर करायला लावले आळीपाळीने लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X )

72 जणांकडून 10 वर्ष पत्नीनेवर करायला लावले आळीपाळीने लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

फ्रान्समध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली. पतीनेच पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी इतरांना ऑफर दिल्याचा भयावह प्रकार घडला आहे. दरम्यान डीएफ या फ्रेंच वीज कंपनीत काम करणाऱ्या 71 वर्षीय व्यक्तीवर 51 जणांसह आपल्या वृद्ध पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पीडित महिलेने 10 वर्षे हा सामूहिक अत्याचार सहन केला. या घृणास्पद कृत्याची तिला माहिती मिळू नये म्हणून हा पुरुष प्रत्येक वेळी पत्नीला औषध देऊन बेशुद्ध करत होता. डॉमिनिक पी नावाचा हा आरोपी अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधायचा आणि त्यांना आपल्या घरी बोलवायचा आणि पत्नीवर अत्याचार करायला लावयचा. हे सर्व 2011 पासून चालू होते आणि एक दशकाहून अधिक काळ चालू होते.

घरात येणाऱ्या पुरुषांसाठी बनवलेले नियम

द सनच्या म्हणण्यानुसार, डॉमिनिकने आपल्या पत्नी गिसेल पेलिकॉटवर अत्याचार करण्यासाठी अनोळखी व्यक्तींना आमंत्रित केलेल्या पुरुषांसाठी नियम बनवले होते. उदाहरणार्थ, त्याने औषधांच्या प्रभावाखाली गिझेलला उठवू नये, आफ्टरशेव्ह करू नये किंवा सिगारेट ओढल्यानंतर येऊ नये. नखे कापूनच त्यांनी घरी यावे असा नियम होता. तसेच कार घरापासून दूर उभ्या कराव्यात आणि बेडरुममध्ये चुकून कोणतेही कपडे विसरुन जाऊ नये म्हणून स्वयंपाकघरात कपडे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. डोमिनिक गिसेलच्या जवळ जाण्यापूर्वी पुरुषांना त्यांचे थंड हात गरम पाण्यात धुण्यास सांगायचा. जेणेकरून गिसेल उठू नये. महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या या सर्व 72 पुरुषांचे वय 26 ते 74 वयोगटातील होते.

तिच्या पतीच्या क्रूरतेचे गडद रहस्य कसे उघड झाले?

महिलेचा लैंगिक छळ 2011 मध्ये सुरू झाला आणि सुमारे दहा वर्षे सुरु होता. पण हे 2020 मध्ये उघडकीस आले जेव्हा पोलिसांनी डॉमिनिकला त्यांच्या स्कर्टखाली महिलांचे व्हिडिओ शूट केल्याबद्दल अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याच्या घरातून असे पुरावे मिळाल्याने अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्याच्या पत्नीला तिच्या नकळत वर्षानुवर्षे झालेल्या अत्याचार्याच्या घटना कळल्या.

अत्याचाराचा आरोप असलेल्या ५१ पुरुषांची ओळख

डॉमिनिक व्यतिरिक्त, अत्याचार करणाऱ्या 72 पैकी 51 पुरुषांची ओळख पटली आहे आणि त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, पती देखील अत्याचार करणाऱ्यांपैकी एक होता आणि त्याने पुरुषांना त्यांच्या पत्नींवर अत्याचार करण्यास प्रोत्साहित केले. त्याने आपल्या काळ्या कारनाम्यांचे अनेक व्हिडिओही बनवले होते. बीबीसीच्या वृत्तानुसार, महिलेच्या वकिलांचे म्हणणे आहे की, महिलेला अशा बेशुद्ध अवस्थेत ठेवण्यात आले होते की तिला वारंवार होणाऱ्या अत्याचाराची जाणीवही होत नव्हती.

बलात्कारातील काही आरोपी विवाहित

अत्याचार करणारे वेगवेगळ्या वयोगटातील, व्यवसाय आणि पार्श्वभूमीतून आले होते. यामध्ये एक कंपनी बॉस, एक पत्रकार, एक फायर ब्रिगेड अधिकारी आणि फोर्कलिफ्ट ड्रायव्हरचा समावेश आहे. त्यापैकी काही विवाहित आहेत, काही अविवाहित आहेत आणि काही घटस्फोटित आहेत. काही कौटुंबिक व्यक्ती देखील आहेत.

न्यायाधीश रॉजर अराटा यांनी सर्व सुनावणी सार्वजनिक होतील असं जाहीर केलं आहे. तसंच महिलेला न्यायालयीन खटल्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण प्रसिद्धी देण्याची इच्छा मंजूर केली जाईल, असं तिचे वकील स्टीफन बॅबोन्यू यांनी सांगितलं आहे. “तिला जितकी शक्य आहे तितकी जागरुकता करायची आहे. तिच्यासोबत जे काही झालं ते इतर कोणासह होऊ नये अशी तिची इच्छा आहे,” असंही त्यांनी सांगितलं. तिचे आणखी एक वकील अँटोनी कामू म्हणाले की, तिच्यासाटी हा खटला म्हणजे एक भयंकर परीक्षा असेल.

“पहिल्यांदा तिला मागील 10 वर्षात झालेल्या प्रत्येक बलात्काराबद्दल पुन्हा बोलावं लागणार आहे,” असं ते म्हणाले. 2020 मध्ये महिलेला सर्वात आधी लैंगिक अत्याचाराबद्दल समजलं. त्याआधीच्या काही आठवणी तिच्याकडे नाहीत असं त्यांनी सांगितलं. महिलेच्या तिन्ही मुलांनी तिला पाठिंबा दिला असून, खटला बंद दाराआड होऊ नये असी त्यांचीही इच्छा आहे. कारण असं करणं हीच आरोपींची इच्छा असेल असं ते म्हणाले आहेत.

Web Title: France news woman testifies on drugging by husband molested by 72 strangers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • France

संबंधित बातम्या

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?
1

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?
2

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी
3

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी

France Strike : फ्रान्समध्ये 24 तासांचा ऐतिहासिक संप; एकाच वेळी 8 लाख लोक रस्त्यावर उतरणार; ‘हे’ आहे कारण
4

France Strike : फ्रान्समध्ये 24 तासांचा ऐतिहासिक संप; एकाच वेळी 8 लाख लोक रस्त्यावर उतरणार; ‘हे’ आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.