Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र….; आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर

ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 10, 2026 | 09:25 PM
अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र....; आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर

अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र....; आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर

Follow Us
Close
Follow Us:

आशिष शेलार आज रात्री फ्रांसच्या दौऱ्यावर जाणार 
युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना करणार अभिवादन
12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत दिले स्थान 

मुंबई: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार हे आज रात्री शिष्टमंडळासह फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत.

11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान ते पॅरिस येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला एका विशेष कार्यक्रमात ते अभिवादन करणार आहेत. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी, युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र मंत्री ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारणार आहे.

फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा 12 किल्ल्यांचा समूह “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे. या फेब्रुवारी 2025 मध्ये ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र स्वीकारण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याच्या या दौऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान असा गौरवशाली आयाम लाभत आहे.

या दौऱ्यात मंत्री ॲड. शेलार हे युनेस्कोचे महासंचालक, संबंधित तज्ज्ञ व भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासमवेत स्वतंत्र बैठकींमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील इतर प्रस्तावित वारसास्थळांबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. कोकणातील कातळशिल्पे, महाराष्ट्रातील सागरी किल्ले तसेच अमूर्त सांस्कृतिक वारशांतर्गत पंढरपूर वारी, गणेशोत्सव व दहीहंडी यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना या भेटीत नवे बळ मिळेल, असा विश्वास मंत्री ॲड.शेलार यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच वांद्रे, मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘महाराष्ट्र वस्तुसंग्रहालया’साठी पॅरिसमधील नामांकित संग्रहालये, त्यांचे व्यवस्थापन, प्रदर्शनरचना, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा अभ्यास करून त्या धर्तीवर येथील संग्रहालय अधिक समृद्ध करण्यासाठी हे शिष्टमंडळ या दौऱ्यात पाहणी व अभ्यास करणार आहे.

अभिमानास्पद! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाच्या विशेष कार्यक्रम व मानवंदना सोहळ्यात मंत्री ॲड. शेलार अभिवादन करणार आहेत. “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पॅरिसमध्ये केलेले हे अभिवादन भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नव्याने अधोरेखित करणारे पाऊल आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यामुळे राज्याचा सांस्कृतिक वारसा, पर्यटनक्षमता आणि जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक भक्कम होणार आहे.

Web Title: Ashish shelar visits france receive world heritage certificate for 12 forts of chhatrapati shivaji maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • France

संबंधित बातम्या

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश
1

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out
2

Raja Shivaji : स्वराज्य… एका नव्या दृष्टिकोनातून! विद्रोहाची सुरुवात अन् स्वराज्याची ठिणगी; ‘राजा शिवाजी’चा पहिला Teaser Out

Eiffel Tower Day : कधी काळी कुरुप मानला जाणारा ‘Eiffel Tower’ आज आहे जगाचे आकर्षण; जाणून घ्या या ऐतिहासिक वास्तूची काही रंजक तथ्ये
3

Eiffel Tower Day : कधी काळी कुरुप मानला जाणारा ‘Eiffel Tower’ आज आहे जगाचे आकर्षण; जाणून घ्या या ऐतिहासिक वास्तूची काही रंजक तथ्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.