Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली. त्यासाठी ३.२५ लाख कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 13, 2026 | 12:55 PM
India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

Follow Us
Follow Us:
  • भारत-फ्रान्स देशांमध्ये ऐतिहासिक करार 
  • ३.२५ लाख कोटी रुपये खर्चाला संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी
  • ११४ राफेल विमान खरेदीवर शिक्कामोर्तब
 

India-France Defence Deal: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली. त्यासाठी ३.२५ लाख कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुवारी डीएसीच्या झालेल्या बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांसाठी विविध अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अमेरिकेकडून सहा P-8I सागरी देखरेख आणि पाणबुडीविरोधी युद्ध विमानांच्या खरेदीलाही यावेळी मान्यता देण्यात आली.

हे देखील वाचा: Google Layoffs Update: गुगलकडून ‘Exit Package’ योजना जाहीर! कर्मचाऱ्यांमध्ये वाढली अस्वस्थता

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मैक्रॉन १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी काही दिवस ही मंजुरी देण्यात आली आहे. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११४ राफेल लढाऊ विमानांपैकी ९० विमाने स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत. या विमानांत ५० टक्केपर्यंत स्वदेशी सामग्रीचा वापर केला जाईल. यापूर्वी भारतात उत्पादित होणाऱ्या विमानांमध्ये ३० टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर करण्याची चर्चा झाली होती. पण, अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील चर्चेत हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढवले जाईल.

या २०२६-२७ आर्थिक वर्षात, संरक्षण मंत्रालयासाठी ७.८५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के जास्त आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या या पहिल्या अर्थसंकल्पात कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तयारी जलद गतीने वाढवण्यावर आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. संरक्षण अर्थसंकल्पासाठी देण्यात आलेली रक्कम एकूण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या १.९९ टक्के आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढत्या जवळीकतेमुळे भारत संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे.

हे देखील वाचा: India-France Rafale Deal: भारत-फ्रान्स संरक्षण करार निर्णायक टप्प्यात! हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी ११४ राफेलची खरेदी

नौदलाची सागरी ताकद वाढणार

संरक्षण अधिग्रहण परिषदेने अमेरिकेकडून सहा पी-८आय सागरी देखरेख आणि पाणबुडीविरोधी युद्ध विमानांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये संरक्षण अधिग्रहण परिषदेने सहा पी-८आय विमानांच्या खरेदीला मान्यता दिली होती. त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एप्रिल २०२१ मध्ये अंदाजे २.४२ अब्ज डॉलर्स किमतीच्या विक्रीला मान्यता दिली, पण, या कराराला आतापर्यंत अंतिम स्वरूप आले नव्हते. आता विमानाच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Big decision in the defense sector with france approval for purchase of 114 rafales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Defence Sector
  • France
  • India-France
  • Jet Airways

संबंधित बातम्या

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
1

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा
2

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
3

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
4

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.