7 लाखांची लाच घेताना महापालिका उपायुक्त ACB च्या जाळ्यात; १० लाखांची केली होती मागणी
पुणे: रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. तक्रारदाराच्या परिचितांना राजेश याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली. नंतर तक्रारदाराने राजेशला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले.
राजगुरुने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भेटायला बोलावले. तक्रारदाराच्या ईमेलवर त्याने रेल्वेत आरोग्य निरीक्षकपदावर नोकरी मिळाल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले. चौकशीत नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. दहा लाख रुपये दिल्यानंतर राजगुरुने नोकरी लावली नाही. तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला
सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला असून, पुन्हा तीन घटनांमध्ये दोन तरुणी अन् एका तरुणाची ३३ लाखांना गंडा घातला आहे. वेगवेगळ्या बहाण्याने तसेच पोलीस कारवाईची भिती घालून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व वापरकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी नोकरी करते. दरम्यान, तिला सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवून त्यांना नुवामा प्रो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच, त्यानंतर त्याच्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यांना या अॅपवरून भरघोस नफा मिळत असल्याची बतावणी केली. त्यांनी १० लाख ९५ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना नफा मिळाला नाही. दुसऱ्या घटनेत तरुणाची तब्बल १२ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तरुणाला युट्यूब पेजला लाईक्स व सबस्क्राईब केल्यावर मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्याला पैसे भरण्यास भाग पाडले. परंतु, त्याला कसलाही नफा न देता त्याची फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला; ३ जणांची तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक
कांदा व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक
बंगळुरुमधील एका कांदा व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कांदा व्यापाऱ्याने मालाची ऑर्डर देऊन पैसे दिल्यानंतर देखील त्याला कांदा न पाठवता फसवणूक केल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी धनंजय खुशालचंद बोरा याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत शशीकुमार टी. वैद्यलिंगम पिल्लई (वय ४६, रा. रवींद्रनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे.