Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आला. त्याने एका महिलेवर बलात्कार केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 28, 2025 | 09:35 PM
तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार (Photo Credit- X)

तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष!
  • हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार,
  • पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
पिंपरी : तडीपार केलेले गुंड कोणतीही परवानगी न घेता शहरात येत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या तडीपार गुंडांवर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. आरोपी दत्तक योजनेअंतर्गत पोलिसांकडून या तडीपार गुंडांवर कोणतीही निगराणी ठेवली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आला. त्याने एका महिलेवर बलात्कार केला. तडीपार केलेल्या आरोपीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे या प्रकरणात निलंबन झाले आहे.

फारुख सत्तार शेख (२५, बालाजीनगर, भोसरी एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे. फारुख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे मूळ वास्तव्य एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजीनगर झोपडपट्टी येथे आहे. तर तो सध्या आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे राहत होता. त्याचा गुन्हेगारी इतिहास पाहता त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ८ एप्रिल २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तडीपार आरोपी दत्तक योजना राबवली जाते. ज्या पोलीस ठाण्यातील आरोपी तडीपार केले जातात, ते आरोपी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलकडे विभागून दिले जातात. तडीपार केलेल्या आरोपींचे लोकेशन घेणे, ते सध्या काय करतात याबाबत माहिती अद्ययावत ठेवणे. त्यांनी कोणताही गुन्हा करू नये यासाठी वेळोवेळी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस कॉन्स्टेबलची असते. आरोपी फारुख सत्तार शेख याला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेप यांना दत्तक देण्यात आले होते.

हे देखील वाचा: अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेप यांनी आरोपी फारुख सत्तार शेख याच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणे, त्याचे वेळोवेळी लोकेशन घेणे, त्याने कोणताही गुन्हा करू नये तसेच तडीपार केलेल्या हद्दीत प्रवेश करू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शेप यांच्यावर होती. मात्र मागील दोन महिन्यांपासून आरोपी फारुख सत्तार शेख हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंबळी फाटा येथील घरी वास्तव्य करीत होता. याची कोणतीही खबर पोलिसांना लागली नाही.

त्याने १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. महिलेने सहा दिवसानंतर याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांना या आरोपीबाबत माहिती मिळाली. वेळीच निगराणी ठेऊन योग्य ती कारवाई केली असती तर महिलेवर अतिप्रसंगाची वेळ आली नसती.

पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेप यांचे निलंबन झाले आहे. शेप यांनी त्यांना दत्तक दिलेला आरोपी फारुख सत्तार शेख याच्यावर निगराणी ठेवणे आवश्यक होते. त्यांनी निगराणी ठेवली नसल्याने तो मागील दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राजरोसपणे वावरत होता. शेप यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

सर्रास तडीपार गुंडांचे शहरात वास्तव्य

तडीपार केलेल्या गुंडांना पोलिसांच्या प्रोसिजर नुसार हद्दीतून बाहेर सोडले जाते. मात्र काही दिवसात हे गुंड पुन्हा शहरात येतात. पोलिसांची परवानगी न घेता येऊन हे गुंड समाजात राजरोसपणे वावरतात. अनेकजण घातक हत्यारे जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण करतात. तडीपारीच्या कालावधीत आपण शहरात वावरत असल्याचे सांगून ते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतात. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केतन प्रकाश शिंदे या तडीपार गुंडाकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहित प्रकाश हिरे, संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनेश गोरख माने या आरोपींकडून देखील पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तर काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील तडीपार गुंड स्वप्नील संजय येडते आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथील तडीपार गुंड अक्षय दशरथ शिंदे यांना कोयता बाळगताना पोलिसांनी पकडले आहे. त्यामुळे तडीपार केलेल्या गुंडांचे शहरात राजरोसपणे वास्तव्य उघड झाले आहे.

हे देखील वाचा: Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Web Title: Police ignore the banished gangster he was so audacious that he raped a woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • crime news
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.