Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

महिलांना रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी औपचारिक शुभारंभ प्रसंगी केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 03, 2026 | 12:03 PM
"प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी...", भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

"प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी...", भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ
  • महिलांना रोजगाराच्या संधी
  • युवकांसाठी कौशल्य विकास
लोहगाव : लोहगावचा विकास केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसावा, हा माझा ठाम संकल्प आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण हे माझ्या प्राधान्यक्रमातील मूलभूत विषय असतील. महिलांना रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास, स्वच्छ व सुंदर परिसर आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ०३ मधील उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी औपचारिक शुभारंभ प्रसंगी केले.

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन

भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ०३ मधील उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी वाघेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराची सुरुवात केली. तसेच हजारो लाडक्या बहिणी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. लोहगाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे-पाटील यांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ०३ (अ) मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत अनिल दिलीप सातव (ब गट), ऐश्वर्या सुरेंद्र पठारे ( क गट) व श्री रामदास दत्तात्रय दाभाडे (ड गट) हेही निवडणूक रिंगणात आहेत.

डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील या उच्चशिक्षित असून डॉक्टर आहेत. त्यांना सामाजिक सेवेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोहगावच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे आजसासरे स्व. दत्तात्रय (भाऊ) रामभाऊ खांदवे हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी जवळपास वीस वर्षे ग्रामपंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्य करत पाणीपुरवठा, वीज, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे सासरे स्व. प्रतापराव दत्तात्रय खांदवे-पाटील यांनी देखील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. लोहगावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्वच्छता अभियान, शाळांमध्ये संगणक कक्ष उभारणी, पाण्याच्या टाक्या, रस्ते विकास, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना तसेच युवकांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘कृषिभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरवले होते.

लोहगावमध्ये अनेक सामाजिक उपक्रमांव्दारे मदतकार्य !

डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव परिसरात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, पाणीपुरवठा सुधारणा, स्टॉर् ड्रेनेज, महिला बचत गटांना आर्थिक मदत, तसेच गरजू नागरिकांसाठी रोजगारनिर्मितीचे उपक्रम राबवले आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोहगावकरांना देणार !

जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेले आशीर्वाद मी कधीही विसरणार नाही. या विश्वासाला मान देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे काम करेन. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोहगावमधील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. १५ जानेवारी रोजी ‘कमळ’ चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रभाग क्रमांक ०३ उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी दिली.

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Web Title: Committed to delivering basic facilities to every family in lohagaon stated by bjp dr shreyas pritam khandve patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Pune

संबंधित बातम्या

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
1

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार
2

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा
3

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 
4

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.