वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक
धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या अवधान येथील महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन प्रा.लि. कंपनीचे संचालक असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला तब्बल ९५ लाखांना गंडविल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नाशिक येथील तिघांना जेरबंद केले आहे.
हेदेखील वाचा : पुण्यात नक्की काय चाललंय? मध्यवर्ती भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ; गुजरातमधील एकाला अटक
महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक असल्याचे भासवून कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॉट्सअप मेसेज करून एका नवीन प्रोजेक्टची बोलणी फायनल झाली असून, त्या प्रोजेक्टची आगाऊ रक्कम भरण्यासाठी ९५ लाख रूपये दिलेल्या अकाऊंटवर आरटीजीएसद्वारे भरण्यास सांगितले. व्हॉट्सअपच्या डीपीवर कंपनीच्या मालकाचा फोटो पाहून हा मेजेस मालकांनी केलेला असल्याचे अकाऊंटंटला वाटले होते.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून नाशिक येथे आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले होते. पथकाने आरोपी मुजम्मील मुस्तक मनियार (वय २५), सरफराज हुसैन शेख (वय २७) या दोन आरोपींसह चांदवड येथून आवेश रफिक पिंजारी यास पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातही केली नागरिकांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी पुन्हा वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ५८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. काही केल्या पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही तर नागरिक चोरट्यांच्या आमिषाला बळी पडतच आहेत. वारजेतील एका नागरिकाची शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने २१ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचा तरुणाला आला राग; अपहरण करून केली मारहाण