File Photo : Crime
अमरावती : रेती घाटाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे आरोपींनी तक्रारदाराच्या भावाचे हॉटेलमधून अपहरण करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.18) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अपहरणकर्ता प्रशांत श्रावण बारई (वय 32, गुरुदेवनगर, अमरावती) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : Crime News: बारामतीमधील ‘ते’ भयंकर हत्याकांड; अखेर पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
शेख इम्रान शेख उस्मान (32, रा. गुरुदेवनगर), प्रफुल्ल राजेंद्र गायकवाड (30 रा. गुरुदेवनगर), कृणाल विनोद कडू (25 रा. मूर्तिजापूर तरोडे), नंदकिशोर दिगंबर राऊत (40, रा. शिवनगरी, तिवसा) आणि फिरोज गफ्फार शेख (27, रा. मोझरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत बारई बुधवारी रात्री आपल्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी काही तरुण तोंडाला रुमाल बांधून चारचाकी वाहनातून हॉटेलमध्ये आले.
प्रशांतला जबरदस्तीने डायनिंग टेबलवरून उचलून हॉटेलबाहेर घेऊन गेले. जिथे तुझ्या भावाने रेती घाटाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्रशांतला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अमरावती येथील भावाच्या घरी नेले. मात्र, येथे त्यांच्या घराला कुलूप होते. त्यानंतर आरोपींनी प्रशांतला मार्डी गावच्या जंगलात नेले आणि नंतर लाकडी काठीने मारहाण केली.
आमच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर ‘तुला आणि तुझ्या मुलांना जीवे’ मारण्याची धमकीही दिली. नंतर आरोपींनी फिर्यादीला माझरी येथे आणून सोडले. या घटनेनंतर शुक्रवारी (दि. 20) याप्रकरणी फिर्यादीने तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शेख इम्रान शेख उस्मान प्रफुल्ल गायकवाड, कृणाल कडू, नंदकिशोर राऊत, फिरोज गफ्फार शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
नागरिकांची ५८ लाख रुपयांची केली फसवणूक
सायबर चोरट्यांनी पुन्हा वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ५८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. काही केल्या पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही तर नागरिक चोरट्यांच्या आमिषाला बळी पडतचं आहेत. वारजेतील एका नागरिकाची शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने २१ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Cyber Crime: आयटी हब व शिक्षणाच्या माहेरघरात पुणे पोलिसांची कामगिरी ‘सुमार’; गुन्हे वाढले, उघडकीचे प्रमाण अत्यल्प