Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: डोळ्यात मिरची, छातीत ‘वाकसा’ने सपासपवार करून हत्या; 5 वर्षांचा वाद जीवावर बेतला!

गडचिरोलीत फर्निचरच्या 5 वर्षांपासून प्रलंबित वादातून तरुणाची निर्घृण हत्या झाली. आरोपीने आधी डोळ्यात मिरची पूड फेकून ‘वाकसा’ने छातीत वार केले. सचिन कोलूरवारचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 09:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फर्निचरच्या पैशांच्या वादातून गडचिरोलीत तरुणाची हत्या.
  • आरोपीने डोळ्यात मिरची पूड टाकून ‘वाकसा’ने छातीत वार केले.
  • सचिन कोलूरवारचा जागीच मृत्यू; आरोपी महेश बुरांडे फरार.
गडचिरोली: गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने आधी तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली त्यांनतर फर्निचर बनविण्याच्या धारदार शस्त्राने (वाकस) छातीवर सपासप वार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. पाच वर्ष जुन्या वादावरून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सचिन रामचंद्र कोलूरवार (35, रा. विवेकानंद नगर) असे मृतकाचे नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव महेश महादेव बुरांडे (34, रा. लांझेडा वॉर्ड) असे आहे. पुण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने कोरोना काळात गडचिरोलीत असताना आरोपी महेश बुरांडे याला सागवानी फर्निचर बनवण्यासाठी 2 लाख रुपये दिले होते. मात्र, ५ वर्ष उलटूनही महेशने फर्निचर दिले नव्हते. या व्यवहारात मध्यस्थी करण्यासाठी सचिन सचिन कोलूरवार व त्याचा मित्र सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महेशच्या घरी गेले होते.फर्निचर अद्याप तयार नसल्याचे पाहून सचिन आणि महेश यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

Pune crime: जामखेड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

यात महेश संतापला आणि त्याने घरातील मिरचीचे तिखट आणले आणि सचिनच्या डोळ्यात फेकले. अचानक फेकल्याने सचिनच्या डोळ्यांची जळजळ झाल्याने सचिन असहाय्य होताच, महेशने फर्निचर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘वाकसा’ने सचिनच्या छातीवर सपासप वार केले. याने सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि काही क्षणात त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी महेश बुरांडे हा घटनेनंतर फरार झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृतक सचिन हा चामोर्शी मार्गावर पानठेला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. ६ वर्षांपूर्वी त्याचा लग्न झाला होता. त्याला एक साडेतीन वर्षांची चिमुकली आहे. या घटनेने रुग्णालयात नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन् नंतर वारंवार अत्याचार केले; घरात कोणी नसताना आला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गडचिरोली शहरातील लांझेडा वॉर्ड येथे ही घटना घडली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपीने आधी मिरची पूड डोळ्यात टाकून ‘वाकसा’ने छातीत वार करून हत्या केली.

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: सचिन रामचंद्र कोलूरवार (वय 35) असे मृतकाचे नाव आहे.

Web Title: Gadchiroli crime murder committed by throwing chili powder in eyes and repeatedly stabbing the chest with a waksa 5 year old dispute proves fatal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.