Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: गडचिरोलीत थरार! मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; कारण काय?

गडचिरोलीतील पालोरा येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली. हल्ल्यावेळी वडील मुलीशी फोनवर बोलत होते. गुन्ह्यानंतर आरोपीने शोधाचा बनाव केला, पण पोलिस तपासात सत्य उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 03:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या
  • हल्ल्यावेळी वडील मुलीशी फोनवर संवादात
  • आरोपीने शोधाचे नाटक केले, पोलिसांनी अटक
गडचिरोली: गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांसोबत वडिलांचा शोध घेण्याचे नाटक केले. पण त्याचा हा बनाव टिकू शकला नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ही घटना आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे १२ एप्रिल रोजी घडली.

काय घडलं नेमकं?

देवाजी आडकू धकाते (६५, रा. ताडूरवारनगर, आरमोरी) या प्रकरणातील हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर आरोपी मुलाचे नाव योगेश देवाजी धकाते (२५) असे आहे. धकाते कुटुंबाची पालोरा गावाजवळ वीटभट्टी असून तेथे ते दोघे पिता पुत्र दिवसभर काम करायचे. पाच मुलीस योगेशच्या जन्म झाला होता. पाचही मुलींचे विवाह झालेले असून योगेशचाही वर्षभरापूर्वी विवाह लावून दिला होता. योगेश लग्नानंतर आई-वडिलांसोबतच एकत्रित राहत होता. त्याची पत्नी गर्भवती होती, त्यातच वडील किरकोळ कारणावरुन रागावत असत, शिवाय गर्भवती असूनही तिला काम सांगायचे, ही बाब योगेशला खटकत होती. यातून पिता-पुत्रात खटके उडत. वडिलांना अद्दल घडविण्यासाठी त्याने त्यांच्या हत्येचा कट रचला.

Uttarpradesh Crime: मेरठमध्ये धक्कादायक प्रकार! 4 महिने मुलीच्या मृतदेहासोबत वडील घरातच राहिले, नंतर…

दोघे पिता- पुत्र अंधार पडल्यावर वीटभट्टीवरुन रोज घरी येत होते. १२ एप्रिल रोजी त्याने वडिलांच्या आधीच घराचा रस्ता धरला. सायंकाळी साडेसात वाजता वडील घराकडे पायी परतत होते. पालोरा गावाजवळच्या बोगद्यानजीक वडील पोहोचताच तेथे आधीच दबा धरून बसलेल्या योगेशने त्यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले. यावेळी वडील मुलगी निकिताशी फोनवरुन बोलत होते, हल्ल्यानंतर मेलो रे… म्हणत ते जोरात ओरडले. मुलीचे काळीज हेलावले. मात्र, तिच्यासाठी पित्यासोबतचा हा संवाद शेवटचा ठरला. तिने तातडीने शेजाऱ्यांना फोन करुन माहिती दिली.

पित्याला शोधण्याचे नाटक आणि…

वडिलांना संपवून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह योगेशने घर गाठले. पाण्याने कुऱ्हाड धुतली. आई कमलबाई, चुलतभाऊ रुपेशसोबत वडिलांना शोधण्याचे त्याने नाटक केले. अखेर बोगद्याजवळ वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, यावेळी योगेशच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्या दिशेने वळली आणि अखेर चौकशीत त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Beed Crime: नात्याला काळिमा! आई माहेरी गेली आणि घडलं भयंकर; नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: कौटुंबिक वाद आणि सततच्या भांडणातून हत्या झाली.

  • Que: हल्ल्यावेळी वडील काय करत होते?

    Ans: ते मुलीशी फोनवर बोलत होते.

  • Que: आरोपी कसा पकडला गेला?

    Ans: संशयास्पद हालचालींमुळे चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.

Web Title: Gadchiroli crime shocking incident in gadchiroli son murders father with an axewhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव
1

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल
2

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार
3

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप
4

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.