
नेरूळमध्ये गुन्हेगारांचा धुमाकूळ! भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर धारदार शस्त्राने हल्ला; मारहाण करून १७ हजारांचा ऐवज लुटला
सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे, गंभीर जखमी झालेल्या वृद्धावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नेरूळमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील रहिवासी सुरेश दिनकर साळवे (वय ६१) हे कामानिमित्त नेरूळमधील बालाजी गार्डन परिसरातून मंदिरासमोरील पायवाटेवरून जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, शरीरावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील सॅंगबॅग, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाला. या प्रकरणी जखमीच्या मुलीने नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
नेरूळ सेक्टर २० मधील बालाजी गार्डन परिसरात विविध धर्मांची भव्य मंदिरे, चर्चेस असून सकाळपासून रात्रीपर्यंत भाविक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, याच परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या संशयित व्यक्तींचा वावर असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. पोलिसांनी कारवाई करत गांजा, ड्रगचे रॅकेट या परिसरातून उध्वस्त केले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील मारामाऱ्या, स्थानकाजवळील कथित अवैध दारूविक्री, अंमली पदार्थांच्या विक्रीचे प्रकार आणि भंगाराच्या दुकानांमधून होत असलेले अंमली पदार्थ विक्रीचे प्रकार समोर आले आहेत. या संबंधित तक्रारींमुळे नेरूळमधील सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. नेरूळ रेल्वे स्थान परिसर या सर्व प्रकारांमुळे कुप्रसिद्ध झाला आहे.
वर्दळीच्या परिसरात सकाळीच एका ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करून लूट केली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.केवळ गुन्हा दाखल करून तपास करण्यापुरती कारवाई न करता परिसरातील संशयित ठिकाणांवर नियमित गस्त, अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम, तसेच रात्रीच्या वेळी विशेष पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी संवेदनशील परिसराची पाहणी करून कठोर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात पश्चिमेला पोलिस बीट उभारणे गरजेचे आहे. तर रेल्वे स्थानक परिसर तसेच लगतच्या नेरूळ गाव भाग, बालाजी गार्डन परिसरात सुरक्षितता राखण्यास मदत होऊ शकेल.
दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Ans: नेरूळ सेक्टर २० मधील तेरणा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी गार्डन परिसरात मंदिरासमोरील पायवाटेवर ही घटना घडली.
Ans: आरोपीने सॅंगबॅग, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज लुटला.
Ans: ६१ वर्षीय सुरेश दिनकर साळवे यांच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यांच्या मुलीने नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.