Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Navi Mumbai Crime: पत्रकार असल्याचे भासवून गैरप्रकार करणाऱ्या शैलेंद्र द्विवेदी याला उलवे पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. द्विवेदी याच्याविरोधात नेमके कोणते आरोप आहेत आणि त्याच्या अटकेमागील प्रकरण काय आहे, याबाबत अधिक तपशील समोर येणे अपेक्षित आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2026 | 07:01 PM
भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला!
  • शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद
  • उलवे पोलिसांची कारवाई
नवी मुंबई : पत्रकारितेचा मुखवटा धारण करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शैलेंद्र देवप्रभाकर द्विवेदी याला अखेर उलवे पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. त्याचा श्री गुरु बिल्डर अँड डेव्हलपर्स नावाने कंपनी आहे, कमी पैशांत घर देण्याचे आमिष दाखवून तब्बल १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत लोणावळ्यातील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Navi Mumbai Crime)

पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२, बेलापूर अंतर्गत उलवे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शैलेंद्र द्विवेदी हा आरोपी होता. आरोपीने आपल्या फर्मच्या माध्यमातून कमी पैशांत घर देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार विजय झा यांची १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या मदतीने १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०४ वाजता लोणावळा येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली.

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण यांसह विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करून पोलीस दलाची बदनामी करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचाही उल्लेख प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.

भुरट्या पत्रकारांना पाठबळ देणाऱ्या खाकीतील व्यक्तींचीही चौकशी होणार का?

या कारवाईनंतर नवी मुंबईतील पत्रकारितेच्या नावाखाली वावरणाऱ्या भुरट्या पत्रकारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्रकारितेचा आधार घेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी जवळीक निर्माण करणे, त्याचा गैरवापर करणे, नागरिकांवर दबाव निर्माण करणे आणि सोशल मीडियावरून वेगवेगळे आरोप करणे, अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

मात्र, केवळ अशा व्यक्तींवर कारवाई करून चालणार नाही. त्यांना पोलीस विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी मदत करत असतील, त्यांच्याशी गोपनीय माहितीची देवाणघेवाण करत असतील किंवा त्यांच्या गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील, तर अशा व्यक्तींचीही चौकशी होणे आवश्यक आहे. उलवे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीच्या अटकेची माहिती दिली, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, येणाऱ्या काळात पोलीस विभागातील अशा भुरट्या पत्रकारांना मदत करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावेही समोर आणली जाणार का, हा खरा प्रश्न आहे.

पोलीस विभागातील संपर्कांची सखोल चौकशी होणार का?

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे तसेच पनवेल पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही पत्रकारितेच्या नावाखाली वावरणाऱ्या काही संशयास्पद व्यक्तींच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा होत असते. अशा व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची, त्यांच्या पत्रकारितेच्या ओळखीची आणि पोलीस विभागातील संपर्कांची सखोल चौकशी होणार का? त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत, हेही पोलीस प्रशासन तपासणार का?

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अशा सर्व संशयास्पद व्यक्तींना रडारवर घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का, याकडे आता नागरिकांसह खऱ्या पत्रकारितेची बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारांचे लक्ष लागले आहे. कारण पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांमुळे प्रामाणिक पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार

💡

Frequently Asked Questions

  • Que: शैलेंद्र द्विवेदी याला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: उलवे पोलिसांनी शैलेंद्र द्विवेदी याला लोणावळ्यातून अटक केली.

  • Que: शैलेंद्र द्विवेदी याच्यावर कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: उलवे पोलिसांनी त्याला जेरबंद केले असून, या प्रकरणाचा पुढील तपशील उपलब्ध माहितीत नमूद नाही.

  • Que: शैलेंद्र द्विवेदी याला कोणत्या पोलिसांनी अटक केली?

    Ans: उलवे पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Fake journalist shailendra dwivedi arrested lonavala ulwe police action sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण
1

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट,  नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Navi Mumbai News: बुलेटच्या फटाक्यांसारख्या आवाजाने नवी मुंबईकर हैराण; बेकायदा सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेजवर धाडी टाकण्याची मागणी
4

Navi Mumbai News: बुलेटच्या फटाक्यांसारख्या आवाजाने नवी मुंबईकर हैराण; बेकायदा सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेजवर धाडी टाकण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.