पुणे : पुणे शहरातून तडीपार केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन नागरिकांना कोयत्याच्या सहायाने धमकावत आरडा ओरड करणार्या सराईत गुंडाला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिजीत उर्फ चौक्या तुकाराम येळवंडे (वय २६, रा. जाधव चाळ, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
येळवंडेला पोलिसांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केलेल्या गुनहेगारांना पुन्हा परत शहरात येण्यास मनाई असते. मात्र, तरीही हे गुन्हेगार पुन्हा शहरात आला. दिनांक १० सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर येथील अब्दुल कलाम शाळेसमोर सराईत गुन्हेगार अभिजीत येळवंडे हा कोयत्याच्या साह्याने लोकांना धाक दाखवत असल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली होती. तो आरडा ओरड करून परिसरा दहशत व घबराहट पसरवत होता.
तसेच मी इकडचा भाई असून, माझी पोलिसांना टिप देता का ? म्हणत माझ्यासमोर या खल्लासच करून टाकतो, मला चौक्या म्हणतात म्हणत कोयता हवेत फिरवत होता. आरोपी आरडा ओरडा करत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता, तो पोलिसांना पाहुन पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.