Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणाची सेटलमेंट; वरळी पोलिस स्टेशनमध्ये आलेला ‘तो’ व्यक्ती कोण?

ही सगळी संशयास्पद घटना आहे. गौरीच्या वडिलांनी सांगितलं होत की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते. गर्भपातासाठी एक फॉर्म भरावा लागतो, त्यावर अनंत गर्जे याचे नाव होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 24, 2025 | 02:58 PM
Gauri Garje News: डॉ. गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणाची सेटलमेंट; वरळी पोलिस स्टेशनमध्ये आलेला ‘तो’ व्यक्ती कोण?
Follow Us
Close
Follow Us:
  • गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
  • अंजली दमानियांना फोन
  • गौरीला मारहाण
Anant Garje & Gauri Garje Crime: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे- गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. पण गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. वरळीत २२ नोव्हेंबरला गौरी यांनी आत्महत्या केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच अनंत गर्जेला अटक करण्यात आली. पण त्याचवेळी या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत वरळी पोलीस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर गौरी पालवे- गर्जे प्रकरणात त्यांनी खळबळजनक आरोपही केले आहेत.

Gauri garje-palve Case: ‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

अंजली दमानिया म्हणाल्या, सकाळी आठ वाजताच मला फोन आला होता. आम्ही बीडवरून आलो आहोत आणि आम्हाला मदत हवी आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. यानंतर मी लगेच वरळी पोलीस स्टेशनला गेले. तिथे तिचे आई-वडील खूप रडत होते. त्यांच्या जावयानेच त्यांना पहिला फोन केला होता. तुमची मुलगी आत्महत्या करत आहे, तिला समजवा. त्यानंतर पाच मिनिटांनी गौरीच्या आईला फोन करून त्यानेच तिने गळफास घेतल्याचे सांगितले.

गौरीला मारहाण

ही सगळी संशयास्पद घटना आहे. गौरीच्या वडिलांनी सांगितलं होत की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते. गर्भपातासाठी एक फॉर्म भरावा लागतो, त्यावर अनंत गर्जे याचे नाव होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या गौरीच्या मैत्रिणींशी मी चर्चा केली. तिच्या मैत्रीणींदेखील गौरीच्या चेहऱ्यावर मार्क असायचे, म्हणजेच तिल मारहाण होत होती. हे स्पष्ट होतं. गौरी स्ट्राँग मुलही होती. ती अशी आत्महत्या करू शकत नाही, असं तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, गौरीचा मृत्यू झाल्यापासून अनंत गर्जे कुठे गायब होते. पोलीस वरळी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवत असताना त्याठिकाणी गौरीच्या सासरचा एकही माणूस उपस्थित नव्हता. जर ही आत्महत्या होती,तर त्याने गायब होण्याची कोणतीही गरज नव्हती. वरळी पोलिस स्टेशनला बीडच्या एका माणसाने सांगितले की, ताई एफआयआर दाखल होताना इथे सेटलमेंटच्या गोष्टी होत होत्या, सिनीयर पीआयच्या केबिनमध्ये एक माणूस आला त्याने पोलिसांकडे तुमचा एक माणूस द्या सेटलमेंट करू, असं सांगतिल. अगदी पीआयच्या समोर या सेटलमेंटच्या गोष्टी सुरू होत्या. एका व्यक्तीने या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी सांगितलं आहे. असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला. तसेच, वरळी पोलिस स्टेशनचे सकाळी ६ वाजल्यापासूनचे सीसीटिव्ही फुटेज आम्हाला हवेत, सेटलमेंटसाठी कोणता पीआय भेटायला गेला होते, हे स्पष्ट होईल, असंही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं.

Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

गौरीच्या अंत्यंसस्कारावेळी वडिलांना अश्रू अनावर

यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अग्निसंस्कार करण्याचा आग्रही धरला होता. त्यावेळी गर्जे आणि पालवे कुटुंबियांमध्ये जोरदार वादही झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. पण त्यानंतरही गावात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.

गौरीच्या पार्थिवावर अत्यंसस्कार सुरू असताना गौरीच्या वडिलांना शोक अनावर झाला. त्यांनी हंबरडा फोडला. सर्वांदेखत ते धाय मोकलून रडू लागले. पोलिस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी विनवणी केली. ” तुम्हाला मुली द्यायच्या असतील तर आम्हाला द्या, तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंतांच्या भपक्यावर जाऊ नका, त्याच्या नादी लागू नका,” गौरीच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान, सुरुवातीला अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती नसल्याने गौरीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी गर्जेला अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

Web Title: Gauri garje news dr gauri garjes suicide case settled who is that person who came to worli police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • BJP
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Gauri garje-palve Case: ‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला
1

Gauri garje-palve Case: ‘श्रीमंतांच्या नादी लागू नका..; गौरीला अखेरचा निरोप देताना वडिलांनी हंबरडा फोडला

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका
2

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन
3

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

Dr. Gauri Palve Case update:  गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक
4

Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.