Dr. Gauri Palve Case update: वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक: गौरी पालवे प्रकरणात पोलिस कारवाई
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणानंतर रविवारी राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गौरीच्या कुटुंबीयांनी वरळी पोलिसांत अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली. कुटुंबीयांच्या खूनाच्या आरोपानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली असून तपासाला वेग आला आहे. घटनास्थळी आणि संबंधित व्यक्तींच्या संवादाची माहिती गोळा करून पोलिस सत्यता शोधण्याचे काम करत आहेत. वरळी पोलिस प्रकरणाचे सखोल तपास करत आहेत आणि पुढील माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल.
दरम्यान, अनंत गर्जेने मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर “ही आत्महत्या नसून तिला मारले गेल्या आरोप गौरीच्या च्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, अनंत गर्जे याच्याविरोधात पुरावे असल्याचा देखील कुटुंबीयांचा आरोप आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रकरणात योग्य ती कारवाई होण्याची मागणी केली आहे. वरळी पोलिस सध्या अनंत गर्जे याची चौकशी करत आहेत आणि कुटुंबीयांच्या आरोपांतील तथ्य शोधण्याचे काम करत आहेत.
Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
२ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. गौरी नायर हॉस्पिटलमध्ये डेंटीस्ट म्हणून कार्यरत होत्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अनंत गर्जे यांनी गौरीचा सातत्याने छळ केला. सप्टेंबरमध्ये घर शिफ्ट करताना गौरीला घरात अनंतच्या अफेअरशी संबंधित काही कागदपत्रे सापडली, ज्यामुळे तिला अनंतबद्दल संशय निर्माण झाला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, याच परिस्थितीमुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह यंदाच्या ७ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे तसेच त्यांची बहीण प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. अवघ्या दहा महिन्यांच्या संसारानंतर गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली असून परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.






