
गौरी गर्जे यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अनंत गर्जे म्हणाले की, ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. घाबरून ३१ व्या मजल्यावरील खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरील माज्या घरात प्रवेश केला. तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवून मी रुग्णालयात नेलं. असं अनंत गर्जे यांनी सांगितलं.
दरम्यान, अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा संशय असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ होते. नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने दोघांची भांडणेही व्हायची, त्या मानसिक तणावातही होत्या. गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काल दुपारी एक वाजल्यापासून त्यांची भांडणे सुरू होती. अनंत गर्जेंचे बाहेरच्या महिलेशी संबंध होते. हे गौरीला माहिती असूनही तिने दुर्लक्ष केंल. तिने ते चॅटिंग पाहिले होते, तिच्या वडिलांनाही ते पाठवून ठेवले होते.मी घरी नसताना तिने आत्महत्या केल्याचे अनंत सांगतोय पण त्यावर आमचा विश्वास नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, माझी बहिण, मुलीचे वडील कालपासून पोलिस ठाण्यात बसून आहेत. पण सामान्य लोकांना न्याय मिळत नाही.
पंकजाताईंना या माणसाबद्दल माहिती नव्हते का, हा किती नालायकपणा करत आहे. अनंत गर्जेने आधी मुलीच्या वडिलांना फोन केला मग कट करून तिच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली. तिची डेडबॉडी माझ्यासमोर आहे. दोन तीन महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. गौरीला त्याच्या अफेअरचे प्रकरणही माहिती होते. तरीही तिने त्याला माफ केले होते. तिने त्याला अनेकदा चॅटिंग करतानाही पाहिले होते. त्यामुळे त्यांच्यात वादही झाले होते. तो तिला खूप टॉर्चरही करत होता, असे आरोप शिवदास गर्जे यांनी केले होते.
चालक ते टोळीप्रमुख, कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून; वाचा शरद मोहोळचा गुन्हेगारी इतिहास
शिवदास गर्जे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “त्याने स्वतःच्या हातावर वार करून घेतले होते. तो तिला धमकी द्यायचा – ‘मी स्वतः मरेल आणि तुला यात अडकवेन’.” गौरी ही डॉक्टर असल्याने तिच्यात लढाऊ वृत्ती होती आणि ती आत्महत्या करेल, हे शक्यच नाही, पंकजा मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत शिवदास गर्जे म्हणाले, “ताईंना याबाबत काहीही माहिती नाही. त्यांचा यात कोणताही दोष नाही. अशा नालायक लोकांना त्या कधीच सांभाळून घेत नाहीत, उलट हाकलून देण्यास त्या मागेपुढे पाहत नाहीत.”
दरम्यान, गौरी गर्जे यांना सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला. कुटुंबीयांची चौकशी सुरू असून अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.