Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्री गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ काही महिन्यांपूर्वीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दोघांचा विवाह झाला होता. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जेंच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशीरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम तत्काळ रद्द केले असल्याची माहिती मिळाली आहे.
मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला असून त्यावर पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोस्टमार्टम अहवालातूनच आत्महत्येचे अचूक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, वरळी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. विवाहाला अवघे १० महिने होत असताना तरुण पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






