Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girish Mahajan: ‘मित्राच्या मुलीसोबतचे फोटो एडिट केले’; गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, सायबर पोलिसांत तक्रार

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, हे फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 11:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गिरीश महाजन यांच्या नावाने आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
  • हे फोटो AI/फोटोशॉपच्या माध्यमातून मॉर्फ केल्याचा दावा करण्यात आला.
  • सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल; संबंधितांवर कारवाईची मागणी.
गिरीश महाजन: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, हे फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांनी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, व्हायरल फोटोंमधील तरुणी कोण? याबाबतही चर्चा सुरू झाली होती. यावर आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Girish Mahajan)

तक्रारीत नेमकं काय?

या तक्रारीनुसार, फोटोशॉपद्वारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे त्यांच्या मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ करून बदनामी करण्यात आली आहे. नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम व एक्स पोस्ट वरून मॉर्फ केलेले फोटो काढून टाकावेत. तसेच फोटो शेअर केलेल्या हँडल्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जलसंपदामंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांनी केली आहे.

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे बनावट एआय निर्मित फोटो तयार करून आणि आक्षेपार्ह मजकूर जोडून एका फेसबुक खातेदाराने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट A) कलम ६६ (सी), ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पोलिस निरीक्षक सतीश गोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल; महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाकडे

काय म्हणाले गिरीश महाजन?

“मला माहिती नाही हे फोटो कसे मॉर्फ करण्यात आले. मी याबाबत सविस्तर खुलासा करणार आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. फोटो मॉर्फिंग करुन ते दाखवले जात आहेत. सेल्फी दाखवले जात आहेत. पण ते मॉर्फिंग केलेले आहेत. मी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी यावर सविस्तर खुलासा करेन”, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. (Girish Mahajan)

या फोटोत आक्षेपार्ह काय ते कळत नाही- गिरीश महाजन

बुलढाणा येथे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ (छेडछाड) केलेले असल्याचे स्पष्ट केले. याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘या फोटोत आक्षेपार्ह काय आहे ते कळत नाही. मागचे लोक कट करून मॉर्फ केलेले ते फोटो आहेत. याबाबत मुंबईतही तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर याबाबत सविस्तर भाष्य करणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.’

‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

💡

Frequently Asked Questions

  • Que: गिरीश महाजन यांच्या कोणत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे?

    Ans: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह फोटो प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

  • Que: गिरीश महाजन यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: त्यांनी हे फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे सांगत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

  • Que: या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून फोटो प्रसारित करणाऱ्या अकाउंट्सचा तपास सुरू आहे.

Web Title: Girish mahajan photos with a friends daughter were edited girish mahajans clarification complaint filed with cyber police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • girish mahajan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.