
GONDIA
नगर परिषदेचे दुर्लक्ष व शहरातील गल्यांवर व्यापाऱ्यांचे वाढते अतिक्रमण या बाबीला लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा नेहमीच काम करीत असते. मात्र, वाहतुकीची कोंडीझाल्यास प्रत्येक माणूस या कोंडीची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, अशी ओरड करतात. परंतु, कोंडी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस गेले तर त्यांना सोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधीचे फोनही पोलिसांना जातात. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ आहे.
शहरातील अरुंद रस्त्यामुळे रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण झाल्यास नागरिक आपल्या चुकीचे खापर पोलिसांच्या शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिस नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी असतात. परंतु, नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. तर वाहनचालक वाहन न थांबविता पळून जातात. शहरातील जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक, शक्ती चौक आणि विशाल मेगा मार्ट चौक या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले आहे. हे सिग्नल तोडून वाहनचालक कुठूनही पुढे निघतो. यामुळे वाहतुकीचा बोजवारा नेहमीच उडाल्याचे लक्षात येते. शहरात सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी जबर दणका दिला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
८८ ट्रैफिक सिग्नल लावले असतानाही वाहनचालक जीव धोक्यात घालून सिग्नल जम्प करतात. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. कारवाईपेक्षा स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वाहन चालकानी नियम मोडू नये. – नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया.
Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना
Ans: अरुंद रस्ते, व्यापाऱ्यांचे अतिक्रमण आणि नियमांचे उल्लंघन.
Ans: वाहनचालकांची बेपर्वाई व अंमलबजावणीत अडथळे.
Ans: सिग्नल जम्प करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; भीतीचे वातावरण निर्माण.