संग्रहित फोटो
तरुणाचा मृतदेह नाल्यात टाकून पसार झालेल्या सहा आरोपींनी हवेली पोलिसांनी अटक केली आहे. विशाल चव्हाण (रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. ‘खडकवासला परिसरातील डोणजे गावातील नाल्यात चव्हाणचा मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली नव्हती. सोशल मिडयावर तरुणाचा फोटो पोलिसांनी व्हायरला केला. त्यावेळी चव्हाण याच्या कुटुंबीयांनी ओळख पटविली. नंतर पोलिसांनी तपास सुरू करुन ६ जणांना अटक केली, अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिली.
पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. तेव्हा चव्हाण मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री खडकवासला परिसरातील डोणजे गावात मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. रात्री साडेअकरापर्यंत चव्हाण घरी परतला नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी मोबाइलवर संपर्क साधला. चव्हाणने प्रतिसाद दिला नाही. चव्हाणचा जेवण करताना मित्रांबरोबर वाद झाला. वादातून मित्रांनी चव्हाण डोक्यात देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून खून केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : लग्नाला महिना होत नाही तोच सासरी जावयाचा खून, जावई सासरी गेला आणि…; कारण काय?
दोघांवर कोयता-काठीने हल्ला
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर कोयता, दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या रागातून दोघेजण जखमी झाले. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली. पोलिसांनी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज खारे व युवराज खारे अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.






