Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फलटणमध्ये शोक आणि संताप! मुंबईहून मृतदेह आणताच गर्दी, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील युवा डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या मृत्यूने फलटणमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईहून त्यांचा मृतदेह फलटणला आणल्यानंतर नातेवाईकांनी दोषींवर कारवाईची मागणी करत रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 02, 2026 | 04:47 PM
फलटणमध्ये शोक आणि संताप! मुंबईहून मृतदेह आणताच गर्दी, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय

फलटणमध्ये शोक आणि संताप! मुंबईहून मृतदेह आणताच गर्दी, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • मृतदेह फलटणला आणताच रुग्णालयासमोर शेकडो नागरिकांची गर्दी
  • आरोपींवर कारवाई होईपर्यंत पार्थिव स्वीकारणार नसल्याची मागणी
  • वैद्यकीय अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Satara News: फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत युवा डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ रुपनवर  यांच्या मृत्यूने फलटणमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी मुंबईहून त्यांचा मृतदेह फलटणला आणण्यात आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर हजारो  नागरिक आणि नातेवाईक जमले. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या कुटुंबीयांमध्ये बाचाबाची झाली. आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

ओएसडीच्या भूमिकेवर प्रश्न

डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वरिष्ठांच्या कथित जाचाला कंटाळून त्यांनी जीवन संपविल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे ओएसडी असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या व्यक्तीचे नाव चर्चेत आल्यानंतर चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, पोलिस तपासात संबंधित व्यक्ती कोणत्याही नेत्यांचे पीए नसल्याचे सध्या समोर येत असल्याचे डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.

हेही वाचा: Mumbai Accident News: घरात सवत पाहताच संतापली पहिली पत्नी; चाकूने प्राणघातक हल्ला, नंतर ११२ क्रमांकावर नक्की काय घडलं?

दोषींवर कारवाईची मागणी

मृतदेह फलटणला आणल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. राजेंद्र यांनी अत्यंत कष्टाने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याने ते अस्वस्थ होते, असा दावा नातेवाईकांनी केला. दोषींवर कारवाई होईपर्यंत पार्थिव स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली.

पोलिसांनी परावृत्त केल्याचा दावा

नातेवाईकांच्या भूमिकेबाबत डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांनी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगण्यात येईल, असे स्पष्ट केले. मुंबईत गुन्हा दाखल झाला तेव्हा काही नावे देण्यात आली नव्हती, असेही त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी राजेंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असताना त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले.

हेही वाचा: Accident News: चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर कारची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी

वैद्यकीय अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी लीला मदने यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा फलटण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास फलटण पोलिसांकडून केला जाणार आहे.

व्हिडिओतील आरोपांवर प्रश्नचिन्ह

डॉ. रुपनवर यांनी मृत्यूपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्तींची नावे घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, दाखल गुन्ह्यात केवळ लीला मदने यांचे नाव असल्याने पोलिसांच्या तपासाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी सुरू आहे.

Web Title: Grief and outrage in phaltan a crowd gathered as soon as the body arrived from mumbai a decision was made not to hold the funeral until the accused are arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 04:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.