Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Accident: सूर्यापेटमध्ये भीषण बस अपघात; लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक, ६ ठार

तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण रसत्यावर अपघात झाला. हैदराबादहून विजयवाड्याकडे जाणाऱ्या खासगी बसची लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असुन अनेक जण जखमी झाले आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 26, 2026 | 11:36 AM
Haidrabad Acciendt: सूर्यापेटमध्ये भीषण बस अपघात; लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक, ६ ठार

Haidrabad Acciendt: सूर्यापेटमध्ये भीषण बस अपघात; लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक, ६ ठार

Follow Us
Follow Us:
  • हैदराबादहून विजयवाड्याकडे जाणाऱ्या खासगी बसचा ट्रकला भीषण धडक
  • बसमधील ४२ प्रवाशांपैकी सहा जणांचा मृत्यू; किमान १२ जण जखमी
  • अपघातानंतर बचावकार्य सुरू; पोलिसांकडून दुर्घटनेचा तपास
 

हैदराबाद : तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी पहाटे खासगी बस आणि लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हैदराबादहून विजयवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या या खासगी बसमध्ये सुमारे ४२ प्रवासी होते.                                                                                          पहाटेच्या सुमारास बस सूर्यापेट जिल्ह्यातून जात असताना तिची ट्रकला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना तसेच बचाव पथकाला माहिती दिली.

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार किमान १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, काही वृत्तांमध्ये जखमींची संख्या अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत आकडेवारीनंतर जखमींची संख्या स्पष्ट होणार आहे.

तेलंगाना के सूर्यापेट में आज एक भीषण सड़क हादसा हुआ जिसका अंदाजा आपको ये वीडियो देखकर लग जाएगा.. हैदराबाद से एलुरु जा रही एक निजी ट्रैवल बस पीछे से लोहे की बड़ी रॉड से लदे कंटेनर में जा घुसी. टक्कर इतनी भयानक थी कि कंटेनर निकली लोहे की भारी-भरकम रॉड बस का अगला हिस्सा और शीशा… pic.twitter.com/SS9A0R9gTl — Kishor Joshi (@KishorJoshi02) August 26, 2026

अपघाताचे नेमके कारण काय?

बसने ट्रकला नेमकी कोणत्या परिस्थितीत धडक दिली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बसचा वेग, चालकाचे वाहनावरील नियंत्रण, ट्रकची रस्त्यावरील स्थिती आणि पहाटेच्या वेळी दृश्यमानता यांसह विविध बाबींची चौकशी केली जात आहे. अपघातस्थळाचा पंचनामा करून वाहनांची तपासणीही करण्यात येत आहे.                              दरम्यान, या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

धक्कादायक ! एसटी बसमध्ये गुंडाची महिलेवर लघुशंका; महिलेच्या मुलीसमोरच घडला प्रकार

मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून दुःख व्यक्त

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली असून जखमींना तातडीने आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला निर्देश दिले.  या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक, वाहनांचा वेग आणि पहाटेच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातामागील नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Haidrabad acciendt truck loaded with iron bars hits 6 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:28 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.