सौजन्य फोटो - सोशल मि़डीया
मेयो परिसरातील या उपहारगृहात महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण तसेच विविध खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली जात होती. मात्र, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना उपहारगृहाकडे नसल्याचे अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान आढळले. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच व्यवसाय सुरू असल्याने विभागाने तत्काळ कारवाई केली.
मदतीचा हात की नराधमांचा सापळा? १९ वर्षीय तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न
तपासणीदरम्यान उपहारगृहातील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसल्याचेही निदर्शनास आले. अन्नपदार्थ तयार करताना आणि हाताळताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तसेच उपहारगृहातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध नसल्याचे आढळले.
याशिवाय अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा तपासणी अहवालही उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने श्री बालाजी उपहारगृह बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांना आवश्यक अन्न परवाना घेणे, कागदपत्रे सादर करणे आणि तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटींची पूर्तता केल्यानंतरच उपहारगृहाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.






