Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: नातेवाइकासोबत बोलल्याचा राग अनावर; विभक्त पत्नीला धमकी देत तिचे केस कापून मध्यरात्री…

एका साध्या बोलण्याचा राग इतका वाढला की मध्यरात्री थेट घरात घुसून विभक्त पत्नीवर हल्ला करण्यात आला. मारहाणीनंतर तिचे केस कापल्याचा प्रकार समोर येताच हर्सूल परिसरात खळबळ उडाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 16, 2026 | 12:09 PM
Crime News: नातेवाइकासोबत बोलल्याचा राग अनावर; विभक्त पत्नीला धमकी देत तिचे केस कापून मध्यरात्री...

Crime News: नातेवाइकासोबत बोलल्याचा राग अनावर; विभक्त पत्नीला धमकी देत तिचे केस कापून मध्यरात्री...

Follow Us
Follow Us:
  • विभक्त पत्नीवर मध्यरात्री हल्ला
  • मारहाणीनंतर केसही कापले
  • बोलण्याचा राग अनावर
 

छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक ठिकाणी एका नातेवाइकासोबत बोलल्याचा राग मनात धरून विभक्त पतीने कुटुंबीयांसह मध्यरात्री पत्नीच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हर्सूल परिसरात घडला. आरोपींनी पीडितेचे केस कापून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच विभक्त पतीने चामड्याच्या बेल्टने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विभक्त पतीसह चौघांविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या बहिणीसोबत खुलताबाद येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी योगायोगाने त्यांची भेट त्यांच्या नणंदेच्या पतीशी झाली. दोघे एकमेकांशी बोलत असताना विभक्त पतीने त्यांना पाहिले. त्यानंतर त्याने या प्रकाराचा राग मनात धरल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मध्यरात्री घरात घुसून मारहाण

शनिवारी (१२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास विभक्त पती आपल्या भाऊ, बहीण आणि आणखी एका नातेवाइकासह पीडितेच्या हर्सूल परिसरातील घरी पोहोचला. आरोपी घरात घुसल्यानंतर पीडिता आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी महिलेने पीडितेला घट्ट पकडून ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी कात्रीच्या सहाय्याने पीडितेच्या डोक्यावरील केस कापले. आपल्याला विद्रूप करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीच्या वेळी विभक्त पतीने चामड्याचा बेल्ट काढून पीडितेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत पीडिता जखमी झाल्या. तसेच ‘तू माझ्यासोबत राहिली नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Pune Accident: खेळता खेळता काळाचा घाला;आई-वडिलांसमोरच पावणेदोन वर्षांच्या मुलीचा करुण अंत 

शेजाऱ्यांच्या मदतीने सुटका

पीडिता आणि त्यांच्या बहिणीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक आणि शेजारी मदतीसाठी धावून आले. नागरिकांची गर्दी जमू लागल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर जखमी पीडितेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी सोमवारी (१४ सप्टेंबर) हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांच्या आदेशानुसार विभक्त पती, त्याचा भाऊ, बहीण आणि आणखी एका नातेवाइकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हर्सूल पोलिस करीत आहेत.

Web Title: Harsul crime ex husband assault divorced wife hair cut sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Chatrapati sambhajiraje

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.