
crime (फोटो सौजन्य: social media)
हरियाणा: हरियाणातील फरीदाबादच्या एनआयटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून ठार मारल्याचे उघड झाले आहे. तापाने फणफणलेल्या नवऱ्याला उपचाराच्या बहाण्याने माहेरी बोलावून तिथेच या भयंकर कृत्याची अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नी पूनमला अटक केली असून, तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.
Buldhana Crime News: पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बुलढाण्यात युवक काँग्रेस अध्यक्षावर गुन्हा दाखल
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव अरुण असून गेल्या काही दिवसांपासून त्याला तीव्र ताप होता. गुरुवारी पत्नी पूनमने उपचाराच्या बहाण्याने अरुणला एनआयटी-5 परिसरातील तिच्या माहेरी नेले. अरुण औषध घेतल्यानंतर विश्रांती घेत असताना, पूनमने आपल्या प्रियकराला घरात बोलावले. दोघांनी मिळून अरुणचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्या वेळी घरात इतर कोणीही उपस्थित नव्हते, असा दावा पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
गुन्हा कसा उघडकीस आला?
अरुणचा खून केल्यानंतर, पूनमने आपल्या सासऱ्यांना फोन करून सांगितले की, अरुणचा तापामुळे मृत्यू झाला आहे. तिच्यावर विश्वास ठेवून कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी पाहिले की अरुणच्या गळ्यावर बेल्टने गळा आवळल्यासारख्या खोल जखमा आहेत. या खुणांमुळे साधा मृत्यू नसून खून झाल्याचा संशय बळावला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली.
आरोपींविरोधात गुन्हा नोंद
सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश कुमार यांनी सांगितले की, मृतकाच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पूनम आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनमला अटक करण्यात आली असून, तिने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले की, अरुण आणि पूनम यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला होता, मात्र लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. पोलिस आता या हत्येत इतर कोणाचा सहभाग आहे का हे तपासत आहेत. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.ही घटना फरीदाबाद परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Ans: फरीदाबाद
Ans: पूनम
Ans: गळा