Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील जिल्हा परिषद शाळेत गैरसमजातून शिक्षिकेने ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. आईने पोलिसांत तक्रार दिल्याने गावात संताप व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 02:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘चूपरी’ शब्दाचा गैरसमज
  • शिक्षिकेने विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिक त्रास
  • आईकडून आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ९ वर्षीय विध्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून विध्यार्थ्याच्या आईने आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र शिक्षिकेने मारहाण का केली? जाणून घ्या.

Chhatrapati Sambhajinagar Crime: पाणी मागून घरात शिरला अन्‌…; रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा आवळून चोरले दागिने, विश्वासाला तडा!

काय घडलं नेमकं?

धैर्य मनोज मिश्रा (वय ९) हा दुपारच्या सुट्टीदरम्यान वॉशरूमकडे जात असतांना त्याच्या मित्राकडे असलेल्या लॉलीपॉपबाबत बोलत होता. गोंदियातील ग्रामीण भागात लॉलीपॉपला ‘चूपरी’ असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र हे शब्द जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीने ऐकले, तिला धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना ‘चूपरी’ म्हटल्याचा गैरसमज झाला. त्या विद्यार्थिनीने ही बाब शोभा गिरडकर शिक्षिकेला सांगितली. त्यांनतर धैर्यला बोलावून घेतले आणि त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

शाळेतून घरी आल्यानंतर धैर्यने झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना माहिती दिली. सायंकाळी धैर्यची आई राणी मिश्रा घरी आल्यानंतर मोठ्या मुलाने घडलेली सगळी घटना आईला सांगितली. आपल्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत त्या संतप्त झाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमगाव पुलिस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेनंतर धैर्य शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे आईने सांगितले.“माझ्या मुलाने काही चुकीचे बोलले नव्हते. गैरसमजातून त्याला मारहाण करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला आहे.

गुन्हा दाखल

राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा करण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलीस तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षिकेवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

भंडारा–गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरला आपण देवदूताचा दर्जा दिला आहे, मात्र त्याच डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने अवघ्या 10 दिवसांच्या चिमुकलीची तब्बल 3 लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…; पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील जिल्हा परिषद शाळेत.

  • Que: विद्यार्थ्याला मारहाण का झाली?

    Ans: ‘चूपरी’ (लॉलीपॉप) या शब्दाचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज झाला.

  • Que: पालकांनी काय भूमिका घेतली?

    Ans: विद्यार्थ्याच्या आईने आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Gondia crime teacher furious over misunderstanding of lollipop 9 year old student brutally beaten

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • crime
  • Gondia
  • Gondia Crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.