crime (फोटो सौजन्य: social media )
दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बसमध्ये बसलेल्या एका महिलेला फोन आला आणि ते शब्द ऐकताच तिला धक्काच बसला. तिला उचकी आली आणि तिने चालत्या बसमध्ये आपले प्राण सोडले. नेमकं काय घडलं?
madhya pradesh: वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
नेमकं काय घडलं?
एका महिलेला एक फोन आला आणि महिलेच्या कानावर पडलेल्या त्या तीन शब्दांमुळे महिलेचं निधन झालं. फोनवर बोलणं झाल्यानंतर महिला ढसाढसा रडू लागली. अश्यात तिच्या आईने काय झालं विचारलं तेव्हा महिला म्हणाली, ‘नवऱ्याच्या फोनवरून एक महिलेने फोन केला आणि मला म्हणाली तुझी सवत बोलतेय…’ हे तीन शब्द ऐकताच महिलेला उचकी आली आणि तिने चालत्या बसमध्येच आपले प्राण सोडले. मृतकाचे नाव रिता असं आहे. या घटनेने महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना दिल्ली येथील हरदोई येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. महिलेची आई गुड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मुलीचं लग्न सीतापूर येथील मछरेहटा येथे केलं. लग्नाच्या १ वर्षानंतर तिला टीबीचा आजार असल्याचे समजले. त्यामुळे नवऱ्यानं तिला माहेरी सोडलं, पण
उपचारानंतर पुन्हा समज घालून मुलीच्या संसाराची घडी बसवून दिली. २०२४ मध्ये रिता हिच्या वडिलांचा देखील निधन झालं आहे. तेव्हा देखील रिता माहेरी आली होती. तेव्हा सुद्धा रिता आणि तिच्या पतीमध्ये वाद झाले होते. तेव्हा सुद्धा रिता हिला माहेरी सोडून तिचा नवरा निघून गेला होता. अश्यात रिता देखील आई आणि भावासोबत दिल्लीत आली.
रिताच्या आईने घडलेली घटना सांगितली
रिताच्या आईने सांगितले की, रिताच्या नवऱ्याच्या फोनवरून एका महिलेने तिला फोन केला. तेव्हा रिता आणि आई बसमध्ये होते. पतीचा फोन आला म्हणून रिता हिने फोन उचलला. तेव्हा आला धक्काच बसला. ती ढसाढसा रडू लागली. आईने रिताला विचारलं असता तिने रडत रडत सांगितले की, एका महिलेचा फोन होता, ती म्हणाली ‘तुझी सवत बोलतेय… आता सासरी कधीच येऊ नकोस…’ हे सांगतांना रिता हिला एक उचकी आली आणि तीच निधन झालं… आता रिता हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. रिताच्या मृत्यूनंतर तिच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नामांकित हॉटेल व्यवसायिकाचा चाकूने भोसकून खून; रागाच्या भरात कामगाराने संपवलं