Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Dombivliतील विद्यार्थिनी निधी तिवारीच्या खात्यात 2.60 कोटींचे संशयास्पद व्यवहार आढळले. उत्तराखंडमधील नागरिकांची फसवणूक करून पैसे फिरवल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई नसल्याने मनसेने प्रश्न उपस्थित

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 11:10 AM
  • विद्यार्थिनीच्या तीन बँक खात्यांत कोट्यवधींचे व्यवहार.
  • उत्तराखंडमधील नागरिकांची सायबर फसवणूक; उल्हासनगरातील व्यक्तीवर संशय.
  • तक्रारीनंतरही कारवाई नसल्याचा आरोप; मनसेची उडी.
डोंबिवली: डोंबिवली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीच्या खात्यात तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आला आल्याचे समोर आले आहे. त्या विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात धाव घेत माझ्या अकाऊंटमध्ये 2 कोटी 60 लाख रुपये कसे आले? याचा तपास करा अशी मागणी केली आहे. या प्रकरणात मनसेने देखील उडी मारली आहे. या प्रकरणातील विद्यार्थिनीचे नाव निधी तिवारी आहे.

काय घडलं नेमकं?

डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात निधी तिवारी ही विद्यार्थिनी राहते. ती कल्याणमधी एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आहे. तिचे नाव चांदनी सिंह असे आहे. ती आरबीएल बँकेत कामाला आहे. तिने निधीचे अकाऊंट उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसे दिले. मला अकाऊंट उघडण्याचे टारगेट दिले आहे असे तिने अकाऊंट उघडताना सांगितले होते. त्यांनतर तिने अकाउंट उघडले.

काही दिवसांनी निधीच्या अकाउंटमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांचे ट्राझेक्शन झाले आहे. तिने केवळ एकच अकाउंट उघडले नव्हते. तर तीन ठिकाणी अकाउंट उघडले होते. अन्य एका अकाऊंटमध्ये 10 लाख रुपयांचे ट्रांझेक्शन झाल्याचे समोर आले. निधीने याबाबत चांदणीला विचारले. तेव्हा तिने टाळाटाळ केली. निधीने चौकशी केली तेव्हा तिला माहिती पडले की, उत्तराखंडातील नागरीकांची फसवणूक करुन ते पैसे निधीच्या अकाऊंटमध्ये टाकले होते. त्या खात्यातून व्यवहार केला गेला.

Pune Crime: पिंपरीत 20 रुपयांसाठी रक्तरंजित वाद! मित्रानेच मित्राच्या गळ्यावर केला वार; आरोपी लातूरमधून जेरबंद

प्रकरणात मनसेची उडी

या प्रकरणात उल्हासनगरात एक व्यक्ती सामील आहे. त्याची माहिती देखील निधीने पोलिसांना दिली होती. गेल्या ३ महिन्यापासून निधी पोलिसांकडे दाद मागत आहे. पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने निधीने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी स्पष्ट आरोप केले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी काही माहिती दिली. परंतु डोंबिवलीतील एका विद्यार्थीनी सोबत गंभीर गुन्हा घडला आहे. उत्तराखंडातील नागरिकांना फसविले गेले आहे. तरी पोलीस दाद देत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही तरुणी तक्रारदार होऊ शकत नाही. मात्र या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बोलावून घेतले होते. मग कारवाई का केली नाही. त्याला असे कसे सोडून दिले. त्या संशयितांना सोडून दिल्याने या प्रकरणाचा छडा कसा लागणार? या तरुणीला आणि फसवणूक झालेल्यांना न्याय कसा मिळणार? आदी प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले आहेत.

चौकशी सुरु आहे

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात तरुणीचा अर्ज आला आहे. चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पोलीस या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत

Web Title: Rs 260 crores entered in students account in dombivli how did she get so much money she ran to the police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • crime
  • Dombivali Crime
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.