
मदतीचा हात की नराधमांचा सापळा? १९ वर्षीय तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न
धक्कादायक ! एसटी बसमध्ये गुंडाची महिलेवर लघुशंका; महिलेच्या मुलीसमोरच घडला प्रकार
साथीदाराकडूनही अत्याचार
मुख्य आरोपीने आपल्या साथीदारालाही सदनिकेत बोलावले. त्यानेही तरुणीवर अत्याचार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तरुणीला नवीन मोबाइल देऊन डेटिंग अॅपवर ‘रोझी’ या नावाने प्रोफाइल तयार करण्यात आले. या माध्यमातून तिला देहविक्रीच्या जाळ्यात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे.
मुंबई, अहमदाबादमध्ये नेल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, तरुणीला देहविक्रीसाठी दोन वेळा मुंबई आणि एकदा अहमदाबाद येथे नेण्यात आले. तेथे ग्राहकांकडून पैसे घेऊन तिच्याकडून देहविक्री करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आईला भेटण्याची विनंती; अखेर सुटका
आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने आरोपीचा विश्वास संपादन केला. ‘मला एकदा आईला भेटायचे आहे,’ अशी विनंती तिने केली. आईला भेटण्याची संधी मिळताच ती घरी परतली आणि तिने आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तिला घेऊन थेट शिरगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
मुख्य आरोपी अटकेत
तक्रार मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या साथीदारासह मुंबई आणि अहमदाबाद येथील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपीच्या सदनिकेत आणखी एका तरुणीची मूळ कागदपत्रे आढळून आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. त्यामुळे या जाळ्यात आणखी किती तरुणी अडकल्या आहेत आणि या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर तिचा वेळीच शोध घेण्यात आला का, तिच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तरुणीचा वेळीच शोध लागला असता, तर तिच्यावर झालेले पुढील अत्याचार टाळता आले असते का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी केलेली कारवाई, शोधमोहीम आणि त्यातील कथित विलंब याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणात केवळ आरोपींना अटक करण्यापेक्षा संपूर्ण रॅकेटचा छडा लावणे महत्त्वाचे आहे. तरुणीला या जाळ्यात नेमके कसे ओढण्यात आले, आणखी किती जणांचा सहभाग आहे, तसेच इतर तरुणीही या रॅकेटच्या तावडीत आहेत का, याचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
“या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी काही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
– प्रवीण मोरे, सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग