Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime: वसमत हादरले! ‘पोलिसांचा खबऱ्या’ असल्याच्या संशयातून तरुणाचा गेम; अंधाराचा फायदा घेत थरारक हत्या

तू पोलिसांचा खबऱ्या आहेस...” या संशयातून सुरू झालेला वाद काही क्षणांत हिंसक हल्ल्यात बदलला. दगड आणि विटांनी केलेल्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने वसमत शहरात खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 10, 2026 | 04:11 PM
Hingoli Crime: वसमत हादरले! 'पोलिसांचा खबऱ्या' असल्याच्या संशयातून तरुणाचा गेम; अंधाराचा फायदा घेत थरारक हत्या

Hingoli Crime: वसमत हादरले! 'पोलिसांचा खबऱ्या' असल्याच्या संशयातून तरुणाचा गेम; अंधाराचा फायदा घेत थरारक हत्या

Follow Us
Follow Us:
  • पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरूणावर हल्ला
  • दगड-विटांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू
  • मृतदेह पोलीस ठाण्यात आणून आंदोलन 
Hingoli News: पोलिसांना गुप्त माहिती देत असल्याच्या संशयातून २२ वर्षीय तरुणाची दगड आणि विटांनी हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना वसमत शहरातील सोमवार पेठ परिसरात घडली. गणेश गुंडाळे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर वसमत शहरात खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पोलिसांचा खबऱ्या’ असल्याचा संशय

प्राथमिक माहितीनुसार, गणेश गुंडाळे याला संशयित आरोपींनी गाठले. तो पोलिसांना गुप्त माहिती देत असल्याचा आरोप करत त्याच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला झालेल्या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. वाद वाढल्यानंतर संशयितांनी जवळील दगड आणि विटांनी गणेशवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली.  हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.

हेही वाचा: Crime news: गाय घेऊन जाताना रस्त्यात अडवलं; मारहाणीसह अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप

मृतदेह पोलीस ठाण्यात आणून आंदोलन

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गणेशच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाईकांनी गणेशचा मृतदेह वसमत शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आणून निदर्शने केली. हत्येतील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आणि आंदोलनात अशा मागण्या होत्या की, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार  नाही अशी  भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला. नागरिकांचा मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला.

पोलिसांकडून तपास सुरू

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली. दरम्यान, या हत्येमागे नेमके कारण काय होते, हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका काय होती आणि पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयाला काही आधार होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Hingoli crime basmat shaken young man killed on suspicion of being a police informant chilling murder committed under the cover of darkness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.