Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेले अन् रक्तरंजित वाद; इंडियन ऑइल अधिकाऱ्याची हत्या

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी कंपनीच्या पथकासह गेलेल्या अधिकाऱ्याचा परतण्याचा मार्गच रक्तरंजित झाला. हिंगोलीतील चोंढी येथे ताबा घेण्यावरून झालेला वाद अचानक विकोपाला गेला आणि धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात इंडियन ऑइलचे व्यवस्थापक महेश शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 03:10 PM
Crime News: पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेले अन् रक्तरंजित वाद; इंडियन ऑइल अधिकाऱ्याची हत्या

Crime News: पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेले अन् रक्तरंजित वाद; इंडियन ऑइल अधिकाऱ्याची हत्या

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून वाद; इंडियन ऑइल अधिकाऱ्यावर हल्ला
  • धारदार शस्त्राने वार; महेश शेळके यांचा जागीच मृत्यू
  • पंपमालकासह पाच जणांविरोधात गुन्हा
 

हिंगोली : पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील चोंढी येथील पेट्रोल पंपावर ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पेट्रोल पंप परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ताबा घेण्यावरून वाद अन् हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे त्यांच्या पथकासह चोंढी येथील पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेले होते. कंपनीच्या नियमानुसार पंपाचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असताना पंपमालक आणि कंपनीच्या पथकात वाद सुरू झाला. ताबा देण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेला प्रकार काही वेळातच वाढला. वाद विकोपाला गेल्यानंतर पंपमालक आणि त्याच्या मुलाने शेळके यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. पेट्रोल पंपाच्या बाहेरच धारदार शस्त्राने शेळके यांच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा: Crime News: ‘दृश्यम’ पाहून वडिलांच्या हत्येचा कट; एक फोन कॉल ठरला घातक, मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

पाच जणांविरोधात गुन्हा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींबाबतही माहिती घेतली जात आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेमागील इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. पेट्रोल पंपाच्या ताब्याबाबत नेमका कोणता वाद होता, तसेच हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर काय घडले, याची माहितीही पोलीस घेत आहेत. दरम्यान, या घटनेची केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही दखल घेतली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महेश शेळके यांच्या हत्येचा निषेध केला. कंपनीच्या अधिकाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे पेट्रोलियम क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Deeply saddened and shocked by the tragic incident in which Shri Mahesh Shelke, Manager (Retail Sales), IndianOil, lost his life in Maharashtra while discharging his official duties. He was a part of a team carrying out the takeover of an IndianOil retail outlet in Hingoli district when he was brutally attacked with a sharp weapon. I strongly condemn this heinous and unacceptable act of violence. I offer my heartfelt condolences to the bereaved family in their hour of unimaginable grief and shock.
@PetroleumMin and @IndianOilcl firmly stand with them and will extend all possible support.
The issue has been taken up with the senior-most officials of the Maharashtra Government and Police to ensure swift and strict action against those responsible, in accordance with law.
The safety, dignity and security of our energy-sector personnel, who work tirelessly to serve the nation, remain paramount.
May the departed soul rest in peace.
Om Shanti. 🙏
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) October 7, 2026

 

Web Title: Hingoli indian oil manager mahesh shelke murder petrol pump sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Hingoli
  • Hingoli Crime
  • Hingoli News
  • Indian Oil
  • petrol pump

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.