हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका करत नाराज शिवसैनिकांना ‘परत या, शिवसेना आपलीच’ अशी भावनिक साद घातली. डिलिमिटेशन आणि संविधानाच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर निशाणा.
हिंगोली तालुक्यात प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने घरातून पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार…
हिंगोली शहरात एका पाच दिवसांच्या नवजात अर्भकाला अज्ञात व्यक्तीने काटेरी झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बालकाला रुग्णालयात दाखल केले…
हिंगोली जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत नसून रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगून गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. याचदरम्यान बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाला.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात 24 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक संबंधांसाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. नांदेड एसपी कार्यालयातील लिपिकावर छळाचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू.
हिंगोलीत बनावट रेल्वे पोलीस बनून फोनद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. अपघाताची खोटी माहिती देत पैसे उकळले जात होते. मध्यप्रदेशातील तिघांना अटक, एक आरोपी फरार आहे.
नांदेड जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान आयोजित करण्यात आले.
०४ फेब्रुवारी ते दि. ०४ मार्च २०२६ या कालावधीत महारेशीम अभियान-२०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 2 तारखेला मतदान होणार असून 3 तारखेला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर येत असून भारतात 2019 मध्ये 9.30 लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. चीननंतर आशियातील सर्वाधिक रुग्ण भारतात आढळले आहेत.