horrible car driver traffic constable dragged bonnet car one km palghar maharashtra crime nrvb
पालघरमधून (Palghar) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे, ज्यात एका १९ वर्षीय कार चालकाने (Car Driver) वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलला (Traffic Police Constable) त्याच्या बोनेटवर (Bonnet) दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. कार चालकाकडे लायसन्सही नसल्याचं (Don’t Have Licence) सांगण्यात येत आहे. पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला अटक (Arrested) केली आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील वर्दळीच्या चौकात कॉन्स्टेबल संपतराव पाटील हे कर्तव्य बजावत होते. त्यानंतर त्यांनी ट्रॅफिक सिग्नल ओलांडल्यानंतर यूपी-३२ डीजे ७७०७ या कारला थांबण्याचा इशारा केला. पाटील चौकशी करत असताना चालकाने अचानक गाडी सुरू केली आणि पोलिस कर्मचाऱ्याला बोनेटवर फरफटत नेले.
[read_also content=”धक्कादायक! दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाचीच पुनरावृत्ती, आधी कारमध्ये तिचा गळा दाबला, ढाब्यावरल्या फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह आणि… https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-news-shraddha-walkar-type-murder-case-in-delhi-girl-dead-body-found-in-fridge-nrvb-369706.html”]
सुमारे दीड किलोमीटरपर्यंत त्याने हवालदाराला अशाच प्रकारे फरफटत नेलं. त्यामुळे पोलीस कर्मचारी जखमी झाला. पाटील म्हणाले की, ट्रॅफिक जॅममध्ये गाडी थांबली आणि आजूबाजूच्या लोकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले.