Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?

भोपाळमध्ये गोंदियाच्या ३३ वर्षीय तरुणीची प्रियकराने गळा दाबून हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघड झाली. प्रेम, वाद आणि ब्लॅकमेलमधून घडलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी २४ तासांत उलगडा केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 10:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मृत तरुणी मूळची गोंदिया जिल्ह्यातील; भोपाळमध्ये प्रियकरासोबत राहत होती.
  • प्रियकर विवाहित असून दोघांमध्ये सतत वाद होत होते.
  • लग्न व पैशांच्या मागणीवरून वाद वाढून गळा दाबून हत्या केल्याचा आरोप.
गोंदिया: गोंदिया येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशच्या भोपाळला गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. एका सेप्टिक टँकमध्ये थेट तिचा मृतदेह सापडला. अशरफी उर्फ सिया (३३ वर्षीय) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा २४ तासात उलगडा केला आहे. मात्र तिच्या सोबत एवढं भयंकर का घडलं? तिची हत्या का करण्यात आली? कोणी केली तिची हत्या? काय घडलं नेमकं? जाणून घ्या सविस्तर.

Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…

काय घडलं नेमकं?

मध्य प्रदेशातील भोपाळच्या निशातपुरा परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला. गुरुवारी संध्याकाळी मुलं खेळात असताना त्यांना टँकमधून दुर्गंध येऊ लागला. त्यांनी ही बाब घरच्यांनी सांगितली. पाहणी करताना टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पेटीत मृतदेह सापडून आला. मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत नव्हत्या. पण तिच्या हातावरील ‘दीपक’ नावाचा टॅटू आणि जन्मतारखेच्या आधारे तिची ओळख पटली. ही घटना 12 फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. सिया ही मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. तेव्हा भयंकर समोर आलं.

इंस्टाग्रामवरून मैत्री आणि…

सिया आणि समीरची ओळख वर्षभरापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली मात्र काही काळानंतर या नात्याचं रूपांतर प्रेमसंबंधात झाले. सियाने समीरसाठी आपले घर सोडले. ती महाराष्ट्रातून थेट भोपाळला जाऊन तिचा प्रियकर समीरसोबत राहू लागली. मात्र ज्या समीरसोबत ती आयुष्य एकत्र जगण्याचं स्वप्न पाहत होती. तो विवाहित होता, एव्हडेच नाही तर तो दोन मुलांचा बापही होता. सिया कमला नगर येथील त्याच्या घरी राहू लागली, मात्र त्यांच्यात रोज वाद होत होते. समीरची पत्नी आणि सिया या दोघात वारंवार भांडण होत होते. समीरने सियापासून अनेक गोष्टी लपवल्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत गेला.

लग्नाला समीरचा नकार

सिया सतत समीरला लग्न करण्यास म्हणत होती. मात्र समीरने लग्न करण्यास नकार दिला. यावर समीरने पाच लाख रुपयांची मागणी केली आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिली असे सांगितले जात आहे. परिस्थिती तणावपूर्ण होऊ लागल्याने तणाव वाढत गेला. यामुळे समीरची पत्नी आपल्या माहेरी निघून गेली.

लोखंडी पेटिट टाकला मृतदेह

सोमवारी संध्याकाळी सिया आणि समीर यांच्यात मोठा वाद झाला. याच वादात समीरने रागाच्या भरात सियाचा गळा दाबला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या भाऊ, आई आणि बहिणीच्या मदतीने तिचा मृतदेह लोखंडी पेटिट बंद करून रात्री उशिरा घराजवळील रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये टाकला.

सियाचे तीन वेळा लग्न

प्राथमिक तपासात सियाचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार. आरोपी समीर हा सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे. समीरच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. सियाचे यापूर्वी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन वेळा लग्न झाले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे.

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणी कोण होती?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील ३३ वर्षीय महिला, जी प्रियकरासोबत राहत होती.

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: लग्नासाठी दबाव, पैशांची मागणी आणि सततचे वाद.

  • Que: मृतदेह कसा सापडला?

    Ans: सेप्टिक टँकमध्ये लोखंडी पेटीत कुजलेल्या अवस्थेत.

Web Title: Maharashtra crime a young woman from gondia went to madhya pradesh to meet her boyfriend and the body was dumped directly into a septic tank what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • crime
  • Maharashtra Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.