मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) आर्थिक विवंचनेला (Financial Crisis) कंटाळून एका कंत्राटदाराने (Contractor) पत्नी आणि चार मुलांसह विष (Suicide Attempt) प्राशन केले. ठेकेदार आणि त्याचे कुटुंबीय सध्या रुग्णालयात दाखल आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळच्या बैरागढ काला गावातील (Bairagarh Kala Village) कंत्राटदार किशोर जाटव (Contractor Kishore Jatav) याने पत्नी आणि चार मुलांसह विष प्राशन केले. आत्महत्या करण्यापूर्वी किशोरने पुतण्याला फोन करून घटनेची माहिती दिली. तात्काळ पुतण्याने गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण घटनेची माहिती डायल १०० ला दिली.
[read_also content=”मुडद्यांनी कारची काच फोडली, तुकडे अंगावर आले, मानेवर बिअरची बाटली मारली, UBER च्या महिला चालकाने सांगितली वेदनादायक कहाणी https://www.navarashtra.com/crime/crime-woman-uber-cab-driver-was-robbed-late-night-in-delhi-criminals-attacked-on-neck-and-body-with-a-bottle-of-beer-nrvb-361221.html”]
झोन ४ चे DCP विजय खत्री यांनी सांगितले की, सर्व ६ जणांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने विष प्राशन केले होते. किशोर जाटव हे घराच्या छताचे केंद्रीकरण (कास्टिंग) करण्याचे काम कंत्राटी पद्धतीने करतात. काही काळ त्यांचे काम नीट होत नव्हते. किशोर जाटव यांनी अनेक लोकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, पण काम करता आले नाही. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. आश्वासनाची पूर्तता न झाल्याने त्याने असे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून एक डायरी मिळाली असून, त्यात पैशांचा हिशेब लिहिला आहे. किशोर जाटव यांनी पत्नी व मुलांसह कीटकनाशक प्राशन केले आहे. सध्या सर्वजण धोक्याबाहेर आहेत.
[read_also content=”लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बांदा येथे दलित महिलेवर बलात्कार, गावातीलच तरुणाने डाव साधला, केला गुन्हा https://www.navarashtra.com/crime/dalit-woman-raped-by-village-youth-in-banda-uttar-pradesh-crime-nrvb-361103.html”]
गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सामूहिक आत्महत्येची घटना समोर आली होती. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. व्याज घेणाऱ्या महिलांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबातील ५ जणांनी विष प्राशन केले होते. भोपाळमधील कर्जबाजारी मेकॅनिक संजीव जोशी यांनी त्यांच्या दोन मुली ग्रीष्मा आणि पूर्वी, पत्नी अर्चना आणि आई नंदिनी यांच्यासह विष प्राशन केले होते. या सामूहिक आत्महत्येसाठी मेकॅनिक आणि त्याच्या कुटुंबीयांनी काही जणांना जबाबदार धरले होते जे व्याजदार म्हणून काम करतात आणि पैसे परत मिळावेत म्हणून कुटुंबाचा छळ करत होते.