
न्यायालयात दावा दाखल केल्याने घरावर दगडफेक
केंदूर (ता.शिरूर) येथील शिळकवाडी येथे राहणाऱ्या उमेश आमनकर यांच्या कुटुंबीयांनी शिरूर न्यायालयात निलेश साकोरे यांसह काही व्यक्तींविरोधात शिरूर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. असे असताना न्यायालयाच्या वतीने विरोधी गटातील इसमांना नोटीस प्राप्त झाल्याने निलेश साकोरे, शंकर साकोरे यांसह आदींनी उमेश आमनकर यांच्या घरासमोर येत घरावर दगडफेक करुन शिवीगाळ, दमदाटी केली. तुम्ही दाखल केलेल्या दाव्याच्या नोटीस आम्हाला आल्या नाही पाहिजे, असे म्हणून घराच्या दरवाजांवर लाथा मारुन तुम्हाला कोयत्याने मारतो, अशी धमकी दिली.
तसेच आमनकर यांच्या घराच्या सीसीटीव्हीचे नुकसान करत घराच्या बाजूने चर खोडून नुकसान केले. याबाबत उमेश किसन आमनकर (वय २५, रा. शिळकवाडी केंदूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी निलेश रामदास साकोरे, शंकर नारायण साकोरे, नवनाथ शिवाजी साकोरे, बाळासाहेब खंडू साकोरे (सर्व रा. केंदूर ता. शिरुर जि. पुणे) यांसह अनोळखी पाच इसमांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर हे करत आहे.
सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ
राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात अनेक जण टोकाचा निर्णय घेत आहेत. अशातच आता बल्लारपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिकी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जीवन विलास झरेकर असे मृत मुलाचे नाव आहे. सैनिकी शाळेत जीवनचे हे पहिलेच वर्ष होते.