Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीने चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; मृतदेह गाठोड्यात झाकला अन्…

राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून, त्याला दारूचे व्यसन होते. शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. नवरा-बायकोमध्ये पुन्हा भांडण झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2025 | 09:22 AM
दगडाने ठेचून गुंडाची हत्या

दगडाने ठेचून गुंडाची हत्या

Follow Us
Follow Us:

सातारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच साताऱ्यात चारित्र्याचा सतत संशय घेणाऱ्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. ही घटना मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आली. याप्रकरणी मेहुणा श्रेयस अनिल कुमार पाटील (वय २०, मेहर देशमुख कॉलनी करंजे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२, रा. मंगळवार पेठ, मूळ राहणार पानमळेवाडी पोस्ट, वर्ये तालुका, सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, रा मंगळवार पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. मेहुण्याशी धक्काबुक्की होऊन जखमी झालेल्या संशयिताला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा राजीव नवले व पोलिस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

घरातच लपविला मृतदेह

आरोपी राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून, त्याला दारूचे व्यसन होते. शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. नवरा-बायकोमध्ये पुन्हा भांडण झाले. याची कल्पना अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती. त्यातच नराधम पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर २० जूनला सकाळी त्यांचा मृतदेह घरातील कॉटच्या खाली कपड्याच्या गाठोड्याने झाकलेल्या स्थितीत आढळून आला.

फिर्यादी व आरोपीमध्ये धक्काबुक्की

यावेळी फिर्यादी श्रेयस पाटील व राजेंद्र शिंदे यांच्यात धक्काबुक्की होऊन शिंदे जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Husband kills wife over suspicion of character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 09:22 AM

Topics:  

  • Satara Crime
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.