Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

Bank Manager Suicide: "टार्गेट पूर्ण होऊनही सतत अपमान आणि मानसिक त्रास!" कराडमध्ये इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीतील धक्कादायक खुलाशाने उडाली खळबळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 15, 2026 | 12:49 PM
Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

Follow Us
Follow Us:
  • कराडमधील इंडियन बँक मॅनेजर यांनी राहत्या फ्लॅटमध्ये केली आत्महत्या
  • वरिष्ठांकडून मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद
  • भावाच्या तक्रारीवरून दोन उच्चाधिकारी महिलांवर गुन्हा दाखल
Bank Manager Suicide: गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ताणतणावामुळे कर्मचाऱ्यांनी टोकाची पावले उचलल्याच्या घटना समोर येत असतानाच, आता साताऱ्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कराडमध्ये इंडियन बँकेच्या एका अधिकाऱ्याने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविकिरण केशव लाडे असे मृत बँक अधिकाऱ्याचे नाव असून, ते कराड शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मृत्यूआधी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून (चिठ्ठी) धक्कादायक खुलासे झाले आहेत.

हेही वाचा: Dating App Story: “लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली, पण…” डेटिंग ॲपवरील प्रेमाचा भयंकर अंत; तरुणाने दिला लग्नास स्पष्ट नकार!

राहत्या फ्लॅटमध्ये संपवले जीवन

बँकेतील पुणे उपक्षेत्रीय आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक आणि असह्य मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत रविकिरण लाडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मूळचे लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील असलेले रविकिरण नोव्हेंबर २०२४ पासून कराड येथील इंडियन बँकेच्या शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. ते गेल्या ११ वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात सेवा देत होते. मात्र, वरिष्ठांचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमध्येच आयुष्य संपवले. या प्रकरणी त्यांचे बंधू अक्षय केशव लाडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

विनाकारण मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक

मृत रविकिरण लाडे यांना उपक्षेत्रीय अधिकारी मैथिली शरण सावला आणि क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव या रजा देत नव्हत्या, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कार्यालयीन मीटिंगमध्ये इतर सहकाऱ्यांसमोर त्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात होती. बँकेचे टार्गेट पूर्ण झाले असतानाही त्यांना सातत्याने घालून पाडून बोलले जात असे आणि विनाकारण मानसिक त्रास दिला जात होता, असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. या सततच्या त्रासामुळेच त्यांना तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या. याप्रकरणी आता उपक्षेत्रीय अधिकारी मैथिली सावला आणि क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: PSI Suicide: पोलीस दलात खळबळ! प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवा पोलीस उपनिरीक्षकाची धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या

हसत्याखेळत्या कुटुंबावर ओढवली वेळ

रविकिरण लाडे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सात वर्षांची मुलगी, भाऊ, वहिनी आणि पुतणी असा परिवार आहे. या घटनेमुळे बँक कर्मचारी वर्तुळात आणि कराड परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेले रविकिरण लाडे हे कोणत्या बँकेत आणि कुठे कार्यरत होते?

    Ans: ते सातारा जिल्ह्यातील कराड येथील इंडियन बँक शाखेत शाखा व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून नोव्हेंबर २०२४ पासून कार्यरत होते.

  • Que: या आत्महत्येमागे नेमके काय कारण समोर आले आहे?

    Ans: पुणे उपक्षेत्रीय अधिकारी मैथिली शरण सावला आणि क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव यांच्याकडून रजा न देणे, मीटिंगमध्ये अपमानास्पद वागणूक देणे आणि सतत मानसिक त्रास दिल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

  • Que: या प्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: मृताच्या भावाच्या तक्रारीवरून उपक्षेत्रीय अधिकारी मैथिली सावला आणि क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Satara karad indian bank manager suicide harassment case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Bank of India
  • Harassment
  • Satara Bank
  • Satara Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
1

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.