सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे मध्यरात्री झालेल्या बेदम मारहाणीत 23 वर्षीय अतिश राऊतचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान पुण्यात त्याचा मृत्यू झाला. दोन आरोपी अटकेत असून घटनेनंतर शिरवळ बंदची हाक देण्यात आली आहे.
सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भावाचे नाव घेण्यात आले, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शिंदेंची पाठराखण केली.
सावरी गावातील कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात स्विमिंग टँक, रिसॉर्ट आणि पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. गाव किंवा वस्ती नसतानाही ७५ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित…
सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील ऊसाच्या शेतात चारही पाय कापलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याची 18 नखे गायब असून दात-मिशा सुरक्षित आहेत. शिकारी, तस्करी किंवा अंधश्रद्धेचा संशय व्यक्त.
कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावात भरदिवसा मामा-भाच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता ही अल्पवयीन मुलगी खासगी क्लासला जात असताना संबंधित युवकाने तिचा पाठलाग केला. त्याने 'मी स्वतःचा जीव देईन' अशा धमक्या देत तिला जबरदस्तीने गाडीत बसवले.
वडापाव सेंटरच्या मालकाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा, अन्यथा दुकान चालू देणार नाही, तसेच ‘एकेकाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तिघांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
साताऱ्यात अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात रूममेट गणेश गायकवाडची हत्या केली. मोबाइलच्या अतिवापरावरून वाद झाल्यानंतर त्याने झोपेत असताना गणेशचा गळा पट्ट्याने आवळून जीव घेतला.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात तैनात असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
परीक्षा झाल्यानंतर संबंधित मुलगी वडिलांकडून चावी घेऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर ती आतल्या खोलीत कपडे काढत होती. त्यावेळी तिच्या घरात व आजुबाजूला कोणी नसल्याचे पाहून राहुल घरात गेला.
सातारा येथील कराडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानात ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादात तरुण ग्राहकाचा मृत्यू…
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. चरित्राच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला.
जुन्या वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. २०१६ मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणी रियाज शेखला संशयित आरोपी म्हणून अटक झाली होती.
हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
सातारा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गरोदर महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. यात महिलेचा आणि एका चिमुकलीचा मुत्यू झाला आहे.
वडूज शहरातील श्री ज्योतिबा मंदिरातून पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची घटना रविवार, ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ तीन दिवसांत आरोपीला जेरबंद केले आहे.