crime (फोटो सौजन्य: social media )
जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध गावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आहे. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केले असल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव समाधान आल्हाट आणि त्यांची पत्नी कीर्ती अल्हाट असे आहे. दुपारी यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर समाधान अल्हाट याने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर समाधान अल्हाट याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास कौटुंबिक वाद झाला. त्याने कौटुंबिक वादातून लोखंडी रोडने डोक्यात वार करून पत्नीचा खून करणाऱ्या पतीनेही गळफास घेतला. ही घटना काल शनिवारी पहाटे पारध बुद्रुक (ता. भोकरदन) येथे घडली. या प्रकरणात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माता- पित्याचा मृत्यू झाल्याने दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरवलं आहे.
समाधान व कीर्ती यांचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होत. त्यांना दोन वर्षांची स्वामींनी नावाची मुलगी व ४ वर्षांचा रुद्र नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. यामुळे कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी (वसई, ता. सिल्लोड) गेली होती. समाधान अल्हाट याने त्यांना पाच-सहा दिवसांपूर्वी पारध आणले होते. परंतु, समाधान आल्हाट याने शनिवारी सकाळी कीर्ती यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घालत खून केला आणि नंतर स्वतःही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पारध पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
चिमुकल्यांना आई झोपलेली वाटली
सकाळी उठल्यानंतर मुलांना आई झोपली आहे असं वाटलं. त्यामुळे रूद्र आणि स्वामिनी ही मुलं घराबाहेर पडली आणि खेळू लागली. आजी (आईची आई) मीराबाई मोकसरे या घरी आल्या, त्यांनी मुलांना आई कुठे आहे, असं विचारलं. मुलांनी आई झोपल्याचं सांगितलं. आजी या हेडंबा यात्रेसाठी काल (शनिवारी) दुपारी ३ वाजता पारध बुद्रुक गावात आल्या होत्या. मुलीच्या घरात जाताच मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि जावयाने गळफास घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.