crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उत्तरप्रदेशातील फतेहपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका महिलेला तिच्या पतीने एक अशी अट टाकली जिला नकार देताच तिच्या पतीने तिला घराबाहेर काढले. हा प्रकार रील बनवण्यास नकार दिल्यामुळे घडला आहे. महिलेच्या पतीची इच्छा होती की पत्नीने घरी बसवून रील बनवावे आणि यांनतर त्यापासून पैसे कमवून ते पतीला द्यावे. याला पत्नीने स्पष्टपणे नकार देतातच संतापलेल्या पतीने घरातून बाहेर काढले. त्यानांतर पत्नी तीन दिवस उपोषणाला बसली. नंतर, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि पत्नीला घरात प्रवेश मिळाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका नावाची एक महिला गेल्या तीन दिवसांपासून आपल्या पतीच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित महिलेने तिच्या पतीच्या कृत्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसात तक्रार करतांना महिलेने सांगितलं की, साहेब! मी घरी बसवून इंस्टाग्राम रिल्स बनवावे आणि त्याच्यासाठी पैसे कमवून द्यावेत, अशी माझ्या नवऱ्याची इच्छा आहे. पण मला ते करायचे नाही. मी नकार दिला तेव्हा त्याने माझ्या पतीने मला घराबाहेर हाकलून लावलं. पोलिसांनी पतीला बाहेर बोलावलं. पोलिसांनी पती आणि पत्नीला समजावून सांगितल्यावर परिस्थिती शांत झाली. त्यानंतर पत्नीला घरात परत घेण्यात आले.
सासरच्या लोकांनी दिला त्रास
नौबस्ता रोडजवळील खागा गावात राहणारे दीपिकाचे वडील संतोष कुमार तिवारी यांनी सांगितलं की, 22 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही आमच्या मुलीचे लग्न ठरवले होतं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण काही काळानंतर मुलीचा नवरा आणि सासरच्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. पुढे परिस्थिती इतकी बिकट झाली की पतीने तिला घर सोडण्यास भाग पाडलं.
पीडितेच्या वडिलांनी काय सांगितलं
पीडितेच्या वडिलांन सांगितलं की, “माझा जावई माझ्या मुलीला म्हणाला की, जर पत्नी पैसे कमवेल तरच तो तिला घरात ठेवेल. तो तिला रील्स बनवण्यास भाग पाडत होता. तो म्हणाला की आजकाल सर्व महिला घरी बसून रील्स बनवतात आणि त्यातून पैसे कमवतात. पण दीपिकाने या सगळ्यासाठी नकार दिल्यामुळे जावयाने तिला घराबाहेर हाकलून लावलं. दीपिका तीन दिवस घराबाहेर धरणे आंदोलन करत बसली.