
Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी काही काळापूर्वी या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. त्यांच्यावर देशाच्या संरक्षणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि माहिती पाकिस्तानशी संबंधित हॅंडलर्सना दिल्याचा आरोप आहे. न्यायालयीन कोठडीत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर एक वेगळीच बाजू आली. अधिकाऱ्याची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली होती. त्या काळात ते वैयक्तिक आयुष्यात काही अडचणींमधून जात असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत सुरु झालेली ओळख हळूहळू जवळीमध्ये बदलली. पुढे या संबंधाचा वापर करुन त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्यात आली, असा तपास यंत्रणांचा संशय आहे.
सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरु झालेला हा संपर्क नंतर संरक्षणाशी संबंधित विषयांकडे वळला. संबंधित महिलेने अधिकाऱ्याचा विश्वास मिळवल्यानंतर त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. ती महिला आपल्या एका सहाकाऱ्यासोबत संरक्षणाशी संबधित ठिकाणी ये-जा करत असल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे. Crime News:
या घटनेची माहिती गप्पांपासून सुरु झालेला हा संपर्क नंतर संरक्षणाशी संबंधित विषयांकडे वळला. संबंधित महिलेने अधिकाऱ्याला विश्वास मिळावल्यानंतर त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. ती महिला आपल्या एका सहकाऱ्यासोबत संरक्षणाशी संबंधित ठिकाणी ये-जा करत असल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे.
या घटनेची माहिती भारतीय हवाई दलाकडून दिल्ली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ३१ मेच्या रात्री संबंधित विंग कमांडरला अटक केली. सुरुवातीला त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेनुसार तुरुंगात पाठवण्यात आले.
तपासात अधिकाऱ्याच्या मोबाईल फोनचीही तपासणी करण्यात आली. याचदरम्यान एका अॅपचा उल्लेख समोर आला आहे. संबंधित महिलेने हे अॅप अधिकाऱ्याच्या फोनमध्ये बसवले होते, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. या अॅपच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ आणि काही कागदपत्रे बाहेर पाठवली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेमकी कोणती माहिती बाहेर गेली, तिचे स्वरूप काय होते आणि ती कुठपर्यंत पोहोचली, याचा शोध सध्या घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक डिजिटल पुरावा महत्त्वाचा मानला जात आहे. मोबाईलमधील संभाषण, फाइल्स आणि इतर डिजिटल तपशील तपासले जात आहेत.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे का? पोलिसांना याबाबत अजूनही संशय आहे. या नेटवर्कमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.
हवाई दलाकडूनही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते आणि पुढील तपासासाठी त्याला संबंधित यंत्रणांकडे सोपवण्यात आले.
पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या
या घटनेमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या अनोळखी ओळखींबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः संवेदनशील पदावर काम करणाऱ्या व्यक्तींनी ऑनलाइन संपर्क आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना किती सावध राहावे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी किती माहिती बाहेर गेली आणि या संपूर्ण कटामागे कोण होते, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.