Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

नांदेड शहरात भररस्त्यात नागरिकांना अडवून मारहाण करणे, खंजिराचा धाक दाखवून लुटणे आणि महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2026 | 12:30 AM
भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

Follow Us
Follow Us:
  • भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी
  • नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
  • पोलिसांनी दोघांना केली अटक
नांदेड : नांदेड शहरात भररस्त्यात नागरिकांना अडवून मारहाण करणे, खंजिराचा धाक दाखवून लुटणे आणि महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बोंडार-हवेली रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात सापळा रचून एलसीबीच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे भाग्यनगर आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन जबरी चोरींसह विविध पोलीस ठाण्यांतील सहा दुचाकी चोरीचे असे एकूण आठ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी सहा मोटारसायकलींसह तब्बल ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

नांदेड शहरातील जबरी चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलीस पथक संशयितांचा शोध घेत होते. याचदरम्यान चैतन्यनगर रोडवरील जबरी चोरीतील संशयित अमेरखान उर्फ एएमके आणि शेख रेहान हे चोरीच्या दुचाकी विक्रीच्या तयारीत बोंडार-हवेली रोडलगतच्या उसाच्या शेताजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमेरखान उर्फ एएमके उर्फ जिहादी (वय २३, रा. इरफाननगर, गाडेगाव रोड, नांदेड) आणि शेख रेहान उर्फ चिल्ला शेख महेबुब (वय १९, रा. मिल्लतनगर, नांदेड) यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

खंजिराचा धाक दाखवून लूट, आसनाची घटना

चैतन्यनगर रोडवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या हातातील अंगठी लुटली होती. हा गुन्हा भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे. तर ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी आसना पुलावर भाजीपाला आणण्यासाठी जाणारे प्रभू काळाबा मोरे यांना आरोपींनी अडविले. त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडल्यानंतर खंजिराचा धाक दाखवत ५ हजार २०० रुपये हिसकावून घेतले होते. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

चोरट्यांकडून सहा महागड्या दुचाकी हस्तगत

आरोपींच्या चौकशीतून आणि निशानदेहीवरून बोंडार-हवेली रोडलगतच्या झाडाझुडपांत लपवून ठेवलेल्या सहा मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये बजाज पल्सर-२२०, हिरो स्प्लेंडर, येझदी रोडस्टर आणि रॉयल एनफिल्डसारख्या वाहनांचा समावेश आहे. भाग्यनगर, रामतीर्थ, विमानतळ, बिलोली आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांतील सहा दुचाकी चोरीचे गुन्हे या कारवाईत उघड झाले आहेत. विशेष म्हणजे, जप्त वाहनांमध्ये अडीच लाख रुपये किमतीच्या येझदी रोडस्टरचाही समावेश आहे. दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इतर साथीदारांचा सहभाग आणि आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पाथकाने ही कारवाई केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नांदेडमध्ये पोलिसांनी कोणत्या टोळीचा पर्दाफाश केला?

    Ans: नागरिकांना अडवून मारहाण करणे, खंजिराचा धाक दाखवून लूट करणे आणि महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

  • Que: या कारवाईत किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: एलसीबीच्या पथकाने अमेरखान उर्फ एएमके उर्फ जिहादी (वय २३) आणि शेख रेहान उर्फ चिल्ला (वय १९) या दोन आरोपींना अटक केली.

  • Que: पोलिसांनी किती मुद्देमाल जप्त केला?

    Ans: पोलिसांनी सहा मोटारसायकलींसह तब्बल ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जबरी चोरीचे दोन आणि दुचाकी चोरीचे सहा, असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Web Title: In nanded the police have busted a gang of habitual thieves nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • Nanded

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
1

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…

मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ
2

मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण
3

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.