काय नेमकं प्रकरण?
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव संदीप मांजरी (45 वर्ष) असे आहे. ते हुक्केरी तालुक्यात घोडगेरी गावचे रहिवासी आहे. याच वर्षी मंदिराच्या जत्रेतून परतत असतांना त्यांचा रस्ते अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले आणि हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून संपल्याचे मानले जात होते.मात्र काही काळानंतर संदीपच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला. त्यामुळे तीन महिन्यांनंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया करावी लागली.
पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या
संदीपच्या कुटुंबीयांचे आरोप काय?
संदीप यांच्या कुटुंबियांचे आरोप आहेत की संदीप यांना रुग्णालयात उपचार सुरू असताना ग्लुकोजच्या बाटलीतून विष देण्यात आला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली. दरम्यान, पुंडलिक डोंबरचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये त्याने अनेक गंभीर दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सुमा हिने संदीप यांच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीचा उल्लेख केला होता. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर दोघेही बेलगावमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार करत असल्याचा दावाही त्याने केला. आणखी एक दावा त्याने या सेल्फी व्हिडीओमध्ये पुंडलिकने केला आहे. संदीप यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना कीटकनाशक आणण्यास सांगण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे.
३ महिन्यांनंतर काढला संदीपचा मृतदेह
कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि तक्रारीनंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेत संदीपचा मृतदेह तीन महिन्यानंतर कबरीतून बाहेर काढला. बेलगावचे सहायक आयुक्त श्रवण कुमार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात आली. मृतदेहाचे नमुने घेण्यात आले असून ते पुन्हा तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अर्थात FSL कडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संदीप यांची पत्नी सुमा मंजारी आणि कथित प्रियकर पुंडलिक डोंबर यांची चौकशी केली आहे. यमकनमरडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
Odisha Crime : नशेत पित्याचं भयंकर कृत्य; पैशांवरून वाद, लाकडी दांडक्याने केली मुलाची हत्या
Ans: अपघातानंतर
Ans: 2 कोटी
Ans: FSL






